पेठ बीड पोलीस ठाणे बनले अवैध धंद्याचे माहेरघर !
पोलिसांच्या आशीर्वाद खुलेआम मटका,गुटका,सुरट,तसेच शिंदी,गांजा विक्री.

- पेठ बीड पोलीस ठाण्यापासून व बार्शी नाका पोलीस चौकीपासून पन्नास फुटावर पोलीस आशीर्वादाने मटका,दारू,गुटखा विक्री तेजीत.
बीड(प्रतिनिधी) बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे अवैध धंद्याचे माहेरघर झाले असून या भागात दारू,गुटका,मटका,शिंदी,गांजा,नशेच्या गोळ्या खुलेआम विक्री होत असून याकडे पेठ बीड पोलीसाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे.तसेच पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत पत्त्याचे क्लब, सूरट पेठ बीड पोलिसाच्या आशीर्वादाने बिनधास्त सुरू आहे.त्यामुळे तरुण व्यासनाधिन होत आहेत.या भागात बहुतांश नागरिक गरीब,मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात, या भागात पहाटेपासूनच दारू विक्री होत असल्याने कामगार दारू पिल्याने बाहेर व घरात भांडने करतात या भागात सकाळपासून दहा ते पंधरा ठिकाणी दारू विक्री होते. याकडे पोलीस अर्थपूर्ण दुर्लक्ष करतात असे दिसून येत आहे.तसेच पेठ बीड भागातील महापुरुषाच्या पुतळ्या जवळ गुटखा,मटका, सुरट जोरात सुरू आहे.काही पोलीस ह्या दोन नंबर वाल्याकडून हप्ते गोळा करून “मोठे”झाले आल्याचे बोलले जात आहे.तसेच बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक भांडण,मारामारी, प्राणघातक हल्ले,खून होत असून बीड पोलीस अधीक्षक यांनी वेळीच लक्ष घालून ठाणे प्रमुखांना सूचना देऊन या भागातील अवधंदे बंद करावेत.पोलीस अधिकारी आय.पी.एस.पंकज कुमावत सारख्या सिंघम अधीकारी इमामपूर रोड ला येऊन गुटखा कारवाई करतात पण पेठ बीड पोलीस ठाणें प्रमुख व स्थानिक पोलीस अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करतात. कुमावत सारख्या अधीकारी यांचा आदर्श घेऊन पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे करणाऱ्या व दारू विक्रत्यावर,सुरट,मटका घेनारावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकाकडून होत आहे.