मोठा निर्णय ! जरांगे पाटील यांची निवडणुकीतून माघार ! आदेश फक्त पाडा
ज्यांनी त्रास दिला त्याला पाडायचंच,मराठा समाजाने कोणाच्या सभेला जायचं नाही.

आनंद वीर(प्रतिनिधी) मराठा संघर्ष योद्धा यांनी महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी आवाहन केले होते. उमेदवारीचा अर्ज घेण्याची शेवटचां दिवस असल्याने मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे सांगितले. कोणताही उमेदवार एका जातीच्या मतावर निवडून येत नसल्याचे सांगितले व मराठा समाजाला असे आवाहन केले की कोणाच्याही सभेला जायचं नाही, ज्यांनी आपल्याला त्रास दिला आहे त्याला पाडायचं, गुपचूप जायचं मतदान करून परत यायचं व पडल्यावर सांगायचं की कसा करेक्ट कार्यक्रम केला. बऱ्याच उमेदवारांनी अर्ज केले होते त्यांची मात्र या निर्णयाने निराशा झाल्याची दिसत आहे. आज सकाळीच मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमासमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली की निवडणुकीतून माघार घेत असून आपल्या मराठा तरुणांनी अर्ज मागे घ्यावेत व ज्याला पाडायचे त्याला पाडा असा आदेश दिला. मनोज जरांगे यांनी मराठा समाजातील लेकरासाठी त्यांना आरक्षण मिळण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार, लढणार व आरक्षण मिळवून देणारच असा विश्वास व्यक्त केला. यामुळे महायुती मधील काही उमेदवाराची नक्कीच धाकधूक वाढल्याचे दिसत आहे.