ताज्या घडामोडी
नवा फॉर्म्युला चिठ्ठी काढून उमेदवारी !
जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने उमेदवारांनी घेतला निर्णय.

आनंद वीर(प्रतिनीधी) मनोज जरांगे यांनी विधानसभा बाबद मोठा निर्णय घेऊन जरांगे हे महाराष्ट्रात कुठेही उमेदवार देणार नसल्याचे सांगितले व उमेदवारानी अर्ज परत घ्यावेत असे आवाहन केले आहे.त्यामुळे उमेदवार हे नाराज असून निर्णायक भूमिका घेणार असल्याची माहिती मिळत आहे.आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने बीड मधील इच्छुक उमेदवार नवीन फॉर्मुला करत चिठ्ठी काढून उमेदवारी बाबद निर्णय घेणार आहेत अशी गुप्त माहिती मिळत असून आज चिठ्ठी काढून उमेदवार ठरवला जाणार आहे.इतर सर्व उमेदवाराच्या विड्रॉल अर्जवर सह्या घेऊन चिठ्ठीत निघालेल्या नाव हे उमेदवाराचे काम,प्रचार करणार असल्याचे एकमत होणार आहे.अशी माहिती मिळणार आहे.