ताज्या घडामोडी
ब्रेकिंग न्यूज जयदत्त क्षीरसागर यांची निवडणुकीतून माघार !
तीन क्षीरसागर एकमेकांसमोर असल्याने निवडणुकीतून माघार.

आनंद वीर ( प्रतिनिधी)जयदत्त क्षीरसागरांनी काय घेतला निर्णय घेणार याची उत्सुकता लागली होती.बीड विधानसभेच्या संदर्भाने मोठी बातमी हाती येत आहे. येथून उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. बीड विधानसभा निवडणुकीत क्षीरसागर कुटुंबातील तिघांनी अर्ज भरले होते. मात्र आता माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी काहीवेळापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज माघारी घेत असल्याचे कळविले आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या समीकरणांमध्ये मोठे बदल होतील. जयदत्त क्षीरसागर हे कोणत्या पुतण्याला साथ येणार आहेत हे येत्या काही दिवसात समजेल.