
आनंद वीर(प्रतिनिधी)बीड विधानसभा निवडणुकीत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. उमेदवारीचा अर्ज मागे घेण्याचां आज शेवटचा दिवस असल्याने बहुतांश उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आज सकाळीच मराठा संघर्ष दमानं जरांगे पाटील यांनी राज्यात कुठेही उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केले त्यामुळे अनेक इच्छुकांचां हीरमोड झाल्याचे दिसते. सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावे अशी सूचना देखील देण्यात आली.व जननी त्रास दिला त्यांना पाडा असे आवाहन समाजाला केले.त्यातच सर्वात मोठा भूकंप म्हणजे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीतून शेवटच्या क्षणी माघारी घेतल्याने कार्यकर्त्यात नाराजी पसरली. शिवसेना शिंदे गटाचे बीड मधील जिल्हाप्रमुख पुणे जगताप यांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला होता परंतु त्यांनी अर्ज मागे घेतला नसून निवडणुकीवर ठाम आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या इच्छुक उमेदवारांनी आणिल जगताप यांना पाठिंबा देण्याचा ठराव केला असून सर्वांनी अनिल जगताप यांचे काम करणार असल्याचे ठरवले आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार अनिल जगताप यांची बाजू भक्कम असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही क्षीरसागराना क्षीरसागर हे टफ असल्याचे मतदारात चर्चा आहे.