जयदत्त अण्णांनी माघार घेतल्याने योगेश क्षीरसागर यांचे पारडे जड !
भावा भावा तगडी फाईट.

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड विधानसभा निवडणुकीत विविध पक्षातील तसेच अपक्ष आणि उमेदवारीसाठी अर्ज केले होते,परंतु आज अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी अचानक जरांगे पाटील यांनी राज्यात उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे इच्छुक उमेदवारात नाराजी पसरली. बीड विधानसभेसाठी इच्छुक असलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी देखील निवडणूक लढवण्यासाठी अपक्ष अर्ज केला होता. शहरात, ग्रामीण भागात प्रचार,गाठीभेटी घेण्यास कार्यकर्त्यांनी सुरुवात केली होती.काका व दोन पुतण्यात ही लढत होती. त्यामुळे बीड विधानसभा निवडणुकीमध्ये तीन क्षीरसागर एकमेकांसमोर येणार अशी परिस्थिती निर्माण झाली असताना आज अचानक दुपारी जयदत्त क्षीरसागर यांनी अर्ज माघारी घेतल्याने बीड जिल्ह्यात, मतदारसंघात खळबळ उडाली व आश्चर्याचा धक्का बसला. जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने डॉ.योगेश क्षीरसागर यांचे पारडे जड झाले असल्याचे दिसत आहे.काकांनी अर्ज काढून घेतल्याने ही लढत भावा भावात तगडी फाईट होणार चर्चा मतदार करत आहेत.