
आनंद वीर (प्रतिनिधी) आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर बीड शहर पोलिसांनी गुन्हेगारां विरुद्ध मोहीम हाती घेतली असून या मोहिमे अंतर्गतच आज त्यांनी सोबत दोन खंजर बाळगण्यास अटक केली आहे.आज खात्रीशीर माहिती मिळाली होती की बीड शहरातील तकीया मस्जिद भागात अभिलेखा वरील गुन्हेगार फिरोजखान हारूण खान पठाण, राहणार तकिया मज्जित जवळ, बीड हा हातात खंजर घेऊन फिरत आहे आणि त्याच्या जवळ दोन खंजर आहेत. त्यामुळे त्या भागामध्ये दहशत पसरली आहे.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी तात्काळ पोलीस टीम रवाना करण्यात आली आणि त्यांनी वरील आरोपीला रंगेहात एक मोठा खंजर आणि कमरेला छोटा खंजर असे दोन शस्त्रासह पकडले आहे. त्याच्यावर भारतीय शस्त्र कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी याच्यावर इरफान शेख रा. तकीय मशिद या इसमास चाकू दाखऊन 1800 रुपये लुटल्याची घटना या अगोदरच दाखल आहे. नमूद आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वांबर गोल्डे, व बीड पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नी.बाबा राठोड , पोलीस अंमलदार गोवर्धन सोनवणे, तोंडे, जयसिंग वायकर,अश्फाक सय्यद व मनोज परजने यांनी केली आहे.