ज्योतीताई मेटे यांचा झंझावात सुर !
स्व.विनायक मेटे स्मृती स्थळापासून प्रचारास सुरुवात.

आनंद वीर(प्रतिनिधी)बीड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून उतरल्या असल्याने शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. तर आज त्यांनी प्रचाराचा शुभारंभ स्व. विनायक मेटे यांच्या स्मृतीस्थळी प्रचाराचा शुभारंभ करुन झंझावात सुरू झाला आहे. शिवसंग्रामच्या डॉ. ज्योती विनायकराव मेटे या बीड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून उतरल्या असून त्यांना चिन्ह ही जनतेला विकासाचे प्रकाश दाखविणारे बॅटरी मिळाले आहे. दहा वर्षांच्या नंतर मेटे हे नाव निवडणुकीच्या मैदानात असल्याने शिवसंग्राम आणि मेटे समर्थकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. स्व. विनायक मेटे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मराठा समाज आरक्षणासाठी लढा दिला असल्याने याचा फायदा या निवडणुकीत डॉ. ज्योती मेटे यांना मिळणार आहे. आज मंगळवारी (दि.५) त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. यासाठी सकाळीच हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विनायकराव मेटे यांच्या स्मृतीस्थळी दर्शन घेऊन रणशिंग फुंकले आहे. कार्यकर्त्यांनी यावेळी जीवाचे रान करुन विजय खेचून आणण्याचा चंग बांधला आहे. मतदारसंघात प्रत्यक्ष प्राचाराला सुरूवात केली आहे. आज हा प्रचाराचा झंझावात १९ गावांमध्ये पोहोचणार आहे.