संदीप क्षीरसागराच्या प्रचारार्थ शरद पवार बीडमध्ये !
बीड शहरात 9 नोव्हेंबर रोजी प्रचार सभा.

आनंद वीर( प्रतिनिधी) बीड विधानसभा निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसत असून सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवार च्या प्रचारासाठी धडाका लावणार आहेत. बीड मतदार संघातील राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ बीड शहरात 9 नोव्हेंबर रोजी सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व मित्रपक्षांचा महाविकास आघाडीचे, बीड विधानसभा मतदारसंघातून अधिकृत उमेदवार असलेले आ. संदीप क्षीरसागर यांनी मंगळवार (दि.५) रोजी मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेतली. या बैठकीत, ९ नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या शरद पवार यांच्या सभेच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले.तसेच प्रचार व इतर सर्व महत्त्वाच्या बाबींवरही चर्चा करण्यात आली. या बैठकीस बीड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्व पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. येथे नऊ नोव्हेंबर रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या प्रचार सभेसाठी नागरिक,कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत असून शरद पवार काय बोलणार याकडे अवघ्या बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.