“घड्याळाचे आधीच बारा वाजलेत” ! सुरेश धस.
लोकांची भावना मोठ्या पवाराकडे आहे,छोट्या पवाराकडे नाही.

आनंद वीर(प्रतिनिधी) विधानसभा निवडणुक प्रचाराला सुरुवात झाली असून विरोधी पक्षातील उमेदवारावर आरोप प्रत्यारोप करत आहेत. परंतु आष्टी मतदार संघात महायुती मधील धुसफुस समोर आली आहे.”घड्याळाचे आधीच बारा वाजलेत…”, सुरेश धस यांचा थेट अजित पवारांवर निशाणालोकांची भावना मोठ्या पवारांकडे आहे, छोट्या पवारांकडे नाही असेही धस म्हणाले आहेत. हा सगळा प्रकार कमळाचे मतं कमी करण्यासाठी चालू आहे, असा थेट आरोप सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केला.गेल्या काही दिवसांपासून आष्टी विधानसभा मतदारसंघात महायुतीत धुसफुस पाहायला मिळत आहे. उमेदवारी जाहीर व्हायच्या आधी सुरेश धस यांनी महायुतीतील तिन्ही उमेदवारांना अपक्ष उभे राहू द्या आणि त्यांची ताकद समजून घ्या, असे आवाहन त्या त्या पक्षांना केले होते.याचीही चांगलीच चर्चा रंगली होती. त्यातच भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत येथे बंडखोरीही केली आता बाळासाहेब आजबे यांच्या उमेदवारीवरून सुरेश धस यांनी थेट अजित पवार यांच्यावरच निशाणा साधला आहे. महायुतीचा उमेदवारी मला घोषित केला जाते आणि पावणेतीन वाजता घड्याळाचा एबी फॉर्म येतो हे महायुतीत काय चालू आहे, अशा शब्दात सुरेश धस यांनी टीका केली आहे. उमेदवार पण डोनाल्ड ट्रम्पच्या पक्षाचा एबी फॉर्म आल्यासारखाच घोषणा करतो. घड्याळाचे आधीच बारा वाजले लोकांची भावना मोठ्या पवारांकडे आहे, छोट्या पवारांकडे नाही असेही धस म्हणाले आहेत. हा सगळा प्रकार कमळाचे मतं कमी करण्यासाठी चालू आहे, असा थेट आरोप सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केला.तसेच आष्टीमधील लढाई ही शिट्टीविरुद्ध कमळ अशी आहे, असा खोचक टोलाही त्यांनी राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे यांना लगावला आहे. बीड जिल्ह्यात एकीकडे युतीत सर्व काही अलबेला असल्याचे दाखवले जात आहे. मात्र सुरेश धस यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेमुळे महायुतीत काहीतरी गडबड असल्याची चर्चा रंगली आहे.