विनापरवाना DJ वाजवला 52 हजारांचा दंड !
बीड शहर पोलिसांची कारवाई.पेठ बीड,शिवाजी नगर पोलीस ठाणे हद्दीत DJ वाजवला तर कारवाई होणार का?

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड शहरात विविध पोलीस ठाणे हद्दीत वाढदिवस, छोटे मोठे कार्यक्रम, उद्घाटन,लग्न समारंभ तसेच विविध कार्यक्रमात राजरोस DJ वाजवले जात आहेत परंतु त्यावर पोलीस कारवाई करत नसल्याचे दिसत आहे परंतु बीड सहर पोलीस ठाणे हद्दीत DJ वाजवणार कारवाई करण्यात आली.बीडशहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स येथे ऋषिकेश जालिंदर शिंदे, राहणार बेलापूर तालुका जिल्हा बीड यांच्या जय मल्हार पान शॉप येथे पान टपरी चे उद्घाटनासाठी विनापरवाना डी.जे.वाजवला म्हणून लक्ष्मणराव मोहन गाडे राहणार सावंगी तालुका परतुर, जिल्हा जालना, विराज नावाच्या या डीजे असलेल्या मालकास 52 हजार रुपये दंड करण्यात आलेला आहे. यासाठी डीजे जप्त करण्यात आला होता आणि दंडात्मक कारवाई करण्यात आली.ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. विश्वांबर गोल्डे, बीड आणि पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी बाबा राठोड पोलीस अंमलदार गोवर्धन सोनवणे, जयसिंग वायकर, अश्फाक सय्यद व मनोज परजने, सुशेन पवार यांनी केली आहे.
अशाच कारवाया झाल्या, तर वचक बसेल
■ सध्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमांत डीजे वाजविला जात आहे. स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने या डीजेवर कसलीही कारवाई होत नाही.
■ अनेकदा विनापरवानगी डीजे वाजवले जातात. आतापर्यंत या डीजेवर केवळ गुन्हे दाखल केले जात होते; परंतु आता पहिल्यांदाच डीजे जप्त करून त्याच्या मालकावर एवढ्या मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
■ आता इतर पोलिस ठाण्यांत देखील अशाच कारवायांची अपेक्षा आहे. सध्या निवडणुका आणि इतर कार्यक्रमांच्या ठिकाणी लावलेल्या डीजेमुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
■पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पदभार घेतल्यानंतर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कारवाया पहिल्यांदाच होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.