वंचित बहुजन आघाडी कडून पुरुषोत्तम वीर मैदानात !
ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची असेल...वीर

आनंद वीर( प्रतिनिधी) बीड विधानसभा निवडणुकीतील महत्त्वाचा समजाला जाणारा वंचित बहुजन आघाडी कडून मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी बीड विधानसभेसाठी पुरुषोत्तम वीर याना विधानसभेच्या मैदानात उतरवले असून वंचित बहुजन आघाडी निश्चितच यश प्राप्त करेन असा विश्वास वंचित चे उमेदवार पुरुषोत्तम वीर यांनी व्यक्त केला. बीडमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ची लढाई असून क्षीरसागरांच्या घराणेशाहीला कडाडून विरोध करत क्षीरसागर यांनी फक्त बीड तालुक्यातील मतदारांना नागरिकांना लुटण्याचे काम केले.शहरातील तसेच ग्रामीण भागातील तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करण्याचे एकही साधन किंवा नवीन उद्योग उभारला नसल्याने,बीड एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग नसल्याने तालुक्यात बेरोजगारीचे प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला या विधानसभेत विजय प्राप्त झाल्यास सर्वप्रथम तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील असून ऊसतोड मजुराचा जिल्हा म्हणून ओळख असलेला हे नाव पुण्यात येईल असे देखील ठामपणे सांगितले. बीड शहराच्या विकास करण्याच्या नावाखाली क्षीरसागरांनी शहर भकासमय केले असून चाळीस वर्षे एक हाती सत्ता असून देखील फक्त स्वतःच्या घराण्याचा विकास केल्याचां आरोप करण्यात आला. त्यामुळे ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असणार आहे. सामाजिक चळवळ व गोरगरिबांसाठी केलेल्या कामाची पावती म्हणून बीडची जनता, मतदार राजा वंचित बहुजन आघाडीला घवघवीत यश प्राप्त करून देणार असल्याचा विश्वास यावेळी बोलून दाखवला.
तसेच बीडकरांसाठी जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न कायमचा सोडवणार महाविकास व महायुतीला जनता कंटाळलेली आहे यामुळे पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीकडे पाहण्यात येत आहे. ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी जो विश्वास दाखवला तो सार्थक करण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न असणार आहे.
*वंचित बहुजन आघाडी मध्ये विविध जाती धर्मातील लोक जोडली गेली असल्याने सर्व जाती धर्मातील मतदार मतदानरुपी आशीर्वाद देतील असे ठामपणे पुरुषोत्तम वीर यांनी सांगितले.