जयदत्त क्षीरसागर सोमवारी निर्णय घेणार ! निर्णयाकडे बीड जिल्ह्याची लक्ष लागले.
दोन्ही पैकी कोणत्या पुतण्याला साथ कोणाला हाथ.का?तहस्थ

आनंद वीर(प्रतिनिधी)- बीड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक माघार घेण्याचा निर्णय घेतलेल्याने कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले होते. जयदत्त अण्णाच्या गटाचे सर्वच कार्यकर्ते हे मागील सहा महिन्यापासून प्रचाराला लागले होते.तसेच काही कार्यकर्त्यांनी युवकांनी बैठका घेऊन जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत प्रवेश देखील घेतले होते. ऐनवेळी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने सर्वांचाच हिरमोड झाल्याची दिसत आहे. जयदत्त क्षीरसागर हे विनिंग उमेदवार असल्याची चर्चा मतदारसंघात परंतु कोणत्याही कार्यकर्त्या ,नेत्याला ,पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता चर्चा न करता अर्ज मागे घेतल्याने सर्वांनी नाराजीचा सूर व्यक्त केला. अर्ज मागे घेण्याने मतदार संघात वेगवेगळे तर्कवितर्क चर्चिले जात होते.जयदत्त क्षीरसागर आता विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने सोमवारी (दि.११) आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.सोमवारी कार्यकर्ता मेळावा घेऊन ते पुढची दिशा दाखविणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता जयदत्त क्षीरसागर काय भूमिका घेणार याकडे केवळ बीड मतदारसंघाचेच नव्हे तर जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.निवडणुकीच्या स्पर्धेतील प्रमुख चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पहिले जात होते, त्यांनी अचानक उमेदवारी मागे घेतल्याने सर्वांनाच धक्का बसलेला आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी उमेदवारी नेमकी का मागे घेतली? आणि आता ते काय करणार?याच्याच चर्चा पाच दिवसांपासून कार्यकर्त्यांमध्ये,मतदारसंघामध्ये आहे.त्यातच दोन दिवसांपूर्वी समाजमाध्यमांमध्ये त्यांच्या फोटोसह एक पोस्ट व्हायरल झाली असून त्यात ‘प्राप्त राजकीय परिस्थितीचे आकलन करून उमदेवार माघारीचा निर्णय कोणालाही न सांगता घ्यावा लागला होता, आता कार्यकर्त्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरवू’असे सांगण्यात आले होते. त्यानुसार आता सोमवारी जयदत्त क्षीरसागर आपली भूमिका जाहीर करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. जयदत्त क्षीरसागर हे रविवारी आपल्या प्रमुख कार्यकर्त्या सोबत चर्चा करतील तर सोमवारी कार्यकर्ता मेळावा घेवू त्यात आपली पुढची राजकीय दिशा ठरवतील असे सांगितले जात आहे. जयदत्त क्षीरसागरानी उमेदवार अर्ज मागे घेऊन आपल्या पुतण्याला वाट मोकळी केली आहे का? याची चर्चा मतदार करत आहेत परंतु दोन्हीपैकी कोणत्या पुतण्याला खेळताना यांची साथ असणार आहे हे सोमवारी स्पष्ट होणार आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेवर बीड विधानसभेची अनेक राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत.त्यामुळे या भूमिकेकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.दोन्हीपैकी कोणत्या पुतण्याला साथ व कोणाला हात की तटस्थ भूमिका हे कार्यकर्त्याशी बैठक घेऊन जयदत्त अण्णा पुढील दिशा ठरवणार आहेत.अण्णांच्या निर्णयाकडे निर्णयाकडे मतदारसंघासह बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.