
आनंद वीर(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून अपघाताची सत्र सुरू त्यातच आज बीड तालुक्यातील नाळवंडी येथील बालाजी रामा घोंगडे वय 27 वर्षे यांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रामा घोंगडे हे वडवणी पासून जवळ जवळ असलेल्या तिगाव या गावी सासरवाडीहून गावाकडे येत असताना आज दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता वडवणी जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर जखमी झाल्याने बेशुद्ध अवस्थेत पडले होते.त्यांना बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉ. तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. नाळवंडी गावातील एक होतकरू, मेहनती तरुणाचा अपघात निधन झाल्याने गावातील मित्रपरिवार नातेवाईक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.