विनोद मुळूक डॉ.योगेश क्षीरसागरांसाठी मैदानात !
विनोद मुळूक यांनच्यामुळे योगेश क्षीरसागराना मिळणार प्रचंड मताधिक्य.

आनंद वीर(प्रतिनिधी)डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांचे कट्टर समर्थक तथा मागील वीस वर्षापासून बीड नगरपालिकेत नगरसेवक व सभापती पदावर कार्यरत असणारे माजी सभापती विनोद मुळूक हे डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या विजयासाठी मैदानात उतरले असून शहरातील विविध भागात विनोद मुळूक यांचा मोठा जनसंपर्क आहे.तसेच प्रभागात केलेली विकास कामे या बळावर योगेश क्षीरसागर यांच्या साठी विनोद मुळूक प्रचारात उतरले असून, योगेश क्षीरसागर च्या खांद्याला खांदा देत प्रचंड मताधिक्यांनी विजय करणार आहेत. विनोद मुळुक यांनी घेतलेल्या जबाबदारीमुळे योगेश क्षीरसागर यांचे ओझे नक्कीच कमी होणार असून शहरातील प्रभागात डोअर टू डोअर प्रचारात उतरल्याने महायुतीचे उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर यांना मतदारसंघात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.विनोद मुळूक यांनी शहरातही अनेक भागात त्यांच्या कॉर्नर बैठक आयोजित करण्यात आले आहे. शहरातील नगरपालिकेत गेली वीस वर्ष सक्रिय राजकारण करणारे माजी सभापती विनोद सक्रियपणे विधानसभा निवडणुकात पुढे आले असून, निवडणूक प्रचाराचा दांडगा अनुभव असल्याने योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे साथ देण्यासाठी विनोद मुळूक पुढे आले आहेत. गेल्या अनेक वर्षाचा राजकीय अनुभव विनोद यांच्या पाठीशी असून या निवडणुकीत योगेश क्षीरसागराना विनोद मुळूक यांच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होणार आहे. शहरातील विविध भागात त्यांनी विकासात्मक कामे केलेली आहेत. कोट्यावधी रुपयांची विकास कामे केलेली आहेत. डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांचे अत्यंत निकटवर्तीय अशी ओळख असणारे विनोद मुळूक मागील काही दिवसापासून सक्रिय राजकारणापासून अलिप्तच होते. डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या रूपाने बीड विधानसभा मतदारसंघात उच्चशिक्षित उमेदवार लोकांची कामे करण्यासाठी तळमळ ठेवणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची भूमिका विनोद यांनी घेतल्यामुळे शहरात डॉ. योगेश क्षीरसागर यांचे पारडे जड झाले आहे.योगेश क्षीरसागर यांच्या झंजावात विधानसभेत सुरू असून या निवडणुकीत त्यांना प्रचंड बहुमत मिळणार आहे.यासाठी अनेक हात त्यांच्यासाठी काम करत असून शहरात योगेश क्षीरसागर यांना मोठी ताकद मिळाली आहे.विनोद मुळूक डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी प्रचंड ताकद उभा करणार असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शहरातून मोठ्या प्रमाणात मत यांच्या पारड्यात पडणार आहेत.विनोद मुळूक यांच्या भूमिकेची इतर नगरसेवक प्रतीक्षा करत होते. परंतु आता विनोद मुळक यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे बरेच विनोद मुळूक यांच्या संपर्कात असल्याचे विश्वसनीय सूत्र आहेत ते देखील लवकरच योगेश यांच्याकडे प्रवेश करणार असल्याचे विश्वसनिय माहिती मिळत आहे. विनोद मुळूक यांच्यामुळे योगेश क्षीरसागर यांचे हात बळकट होऊन, तरुणांची एक फौज पाठीशी उभा राहणार असल्याने महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांचा विजय निश्चित असल्याचे विनोद मुळूक यांनी ठामपणे सांगितले आहे.