
आनंद वीर(प्रतिनिधी) बीड शहरातील नगर रोड चे काम सुरू असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून वाहतूक कोंडी पासून व धुळीपासून सुटका होण्यासाठी नागरिक अंबिका चौकातून ये जा करत आहेत.बीड शहरातील अंबिका चौक जवळ आंबेवडगाव येथील पोलीस कर्मचारी सुनील घोळवे हे कर्तव्यावर जात असताना सिमेंट वाहतूक करणारा ट्रक च्या चाकाखाली येऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सुनील घोळवे वय 47 यांचा डोक्यावरून ट्रक चे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक नागरिकांनी त्यांना बीड येथील शासकीय रुग्णालयात घेऊन गेले त्यावेळी नातेवाईक मित्रपरिवार पोलीस कर्मचारी यांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती.