कुटुंबावर व समाजावर झालेल्या खोट्या गुन्ह्यामुळे मोहन जगताप यांना पाठिंबा !
माजी सभापती नितीन नाईकनवरे यांचा मोहन जगताप यांना पाठिंबा.

जगतापांचे वाढले बळ.सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक-मोहन जगताप.
माजलगाव (प्रतिनिधी )दि.9 आ.प्रकाश सोळंके यांनी या पाच वर्षात सुडाचं राजकारण केलं आहे.पूर्वी पंचवीस वर्षात कधी केलं नाही ते त्यांनी या पाच वर्षात केलं आहे.माझ्या कुटुंबीयातील सदस्यावर हे गुन्हे दाखल केले आहेत.मराठा संदर्भात आरक्षण प्रश्नावरही त्यांनी वादग्रस्त विधान करून समाजाचा रोष घेतला आहे.त्यामुळे मी मोहन जगताप यांना पाठिंबा देत आहे.असे पत्रकार परिषदेत सांगत मा.सभापती नितीन नाईकनवरे यांनी जगताप यांना पाठिंबा दिला.यामुळे जगतापांचे बळ वाढले आहे.यावेळी मोहन जगताप यांनी सर्व जाती-धर्माच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देनार असे सांगितले.शनिवार दि.9 रोजी नितीन नाईकनवरे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.यावेळी पत्रकारांना माहिती देताना नाईकनवरे म्हणाले की,माजलगाव मतदार संघात आपल्या आमदार महोदयाची या पाच वर्षात एकाधिकारशाही वाढली आहे. सुडाचं राजकारण करून त्यांनी अनेकांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या कुटुंबातील सदस्यांनाही त्यांच्या या राजकारणाचा परिणाम भोगावा लागला आहे.मराठा आरक्षण प्रश्ना संदर्भात त्यांचे वादग्रस्त विधान समाजाला न पचणारे आहे.त्यामुळे माझा मोहन जगताप यांना पाठिंबा आहे.त्याच बरोबर माझ्यासोबत असणारे सरपंच,चेअरमन,कार्यकर्ते यांनीही मोहन जगताप यांची पसंती माझ्याजवळ बोलून दाखवली, त्यामुळे मी मोहन जगताप यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.असेही ते यावेळी या म्हणाले.मोहन जगताप हे कार्यकर्ता, सांभाळणारे,त्याला ताकद देणारे एकमेव राजकीय नेते आहेत असे नितीन नाईकनवरे यावेळी म्हणाले. तर मुस्लिम समाजाला दोन वेळेस नगराध्यक्ष,कैकाडी समाजाला जिल्हा परिषद सदस्यत्व,वडार समाजाच्या सर्वसामान्य व्यक्तीला नगराध्यक्ष,मागासवर्गीय समाजाच्या व्यक्तीला पंचायत समितीचे सभापती पद देण्याचे काम तर ओबीसी समाजालाही सत्तेत पद देऊन सत्तेच्या भागीदारीत अनेक जात समूहांना वाटेकरी आमचे वडील माजी आ.बाजीराव जगताप यांनी केले आहे.तोच संस्कार माझ्यावर आहे. त्यामुळे जगताप परिवार हे सर्व समाजाला सन्मानपूर्वक वागनुक देणारं परिवार असल्याचे जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी माजी आ.बाजीरावभाऊ जगताप,किसनभाऊ नाईकनवरे, नारायण डक,दयानंद स्वामी, मिलिंद आव्हाड,कॉम्रेड दत्ता डाके, गंगाभीषण थावरे,सहाल चाऊस, नारायण होके,कचरू खळगे,राहुल जगताप,दत्ता नाईकनवरे कल्याण नाईकनवरे यांच्यासह पदाधिकारी सरपंच कार्यकर्ते नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.नितीन नाईकनवरे यांची सामाजिक, राजकीय क्षेत्रात उमदा मराठा कर्तुत्ववान तरुण म्हणून ओळख आहे.त्यांच्या पाठिंब्याने मोहन जगताप यांच्या विजयाला बळकटी मिळत असल्याचे दिसून येत आहे.