मोठी कारवाई ! घातक शस्त्र बाळगणारावर कारवाई,शस्त्रसाठा जप्त.
शिवाजीनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी.

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यावर, फरार आरोपी, गुंडागिरी करणाऱ्या वर कठोर कारवाई करण्याची सूचना बीड पोलीस अधीक्षक अविनाश बागल यांनी दिली असल्याने बीड जिल्ह्यातील जागोजागी चौकात नाकाबंदी केली जात असून,वाहनाची कडून तपासणी केली जात आहे.
बीड शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील राजु महासिंग टाक वय 40 वर्षे रा.पालवन रोड बीड याचेकडे अवैध शस्त्रसाठा असल्याची गोपनीय बातमी मिळाल्यावरुन दिनांक 09/11/2024 रोजी 09.20 वा. पालवन रोड येथील राहत्या घरी पंचासह छापा मारला असता आरोपीचे ताब्यात एक तलवार, एक कोयता, एक कुकरी, एक चाकु असे अवैध धारदार शस्त्रसाठा मिळुन आल्याने पोलीस हवालदार रविंद्र आघाव यांचे फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. 571/2024 कलम 4/25 शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन पुढील तपास मपोह/1707 गायसमुद्रे या करीत आहेत.ही कामगीरी पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, पोलीस उपनिरीक्षक, अंकुश निमोणे, पोलीस हवालदार रविंद्र आघाव, पोलीस शिपाई लिंबाजी महानोर, सुदर्शन सारणीकर, महीला पोलीस अंमलदार कविता भासले यांनी केली आहे.