आरक्षणाला विरोध करणाऱ्याना पाडा ! जरांगे पाटील
कोणालाही पाठिंबा नसल्याचे केले स्पष्ट.

प्रतिनिधी -मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला होता.मात्र अचानक निवडणुकीतून माघार घेत, उमेदवारांना पाडण्याची भूमिका घेतली. मनोज जरांगेंच्या या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. आज मनोज जरांगे यांनी आमच्याबद्दल संभ्रम शब्द वापरला जात आहे. त्यात संभ्रम असण्याचे काही कारण नाही. आरक्षणाचा विरोध करणाऱ्यांना पाडा. तुमच्या हिताचा निर्णय घ्या, अशा सूचना समाजबांधवांना दिल्या आहेत.मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. ते म्हणाले, आपण आरक्षणासाठी एकत्र आलो आहोत. आमच्याबद्दल संभ्रम शब्द वापरला जात आहे. पण मराठा समाजात कोणताही संभ्रम नाही. काही लोक स्वतःला निवडून येण्यासाठी संभ्रम पसरवत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडायचे नाही जरांगे म्हणाले, आरक्षणाला ज्यांनी त्रास दिला त्यांना सोडू नका, त्यांचा उभा कार्यक्रम करा, आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडायचे नाही. आपले कोणी काहीही करू शकत नाही, कोणाचीही सत्ता येऊ द्या, देवेंद्र फडणवीस सुद्धा काही करू शकत नाही. कोणालाही घाबरण्याची गरज नाही. समाजाच्या हिताचा निर्णय घ्या, ज्याने आपल्या जातीवर अन्याय केला, त्याला पाडा. मराठा समाजाने गावागावात आपल्या आंदोलनाशी सहमत असणाऱ्यांचा समर्थन म्हणून व्हिडिओ घ्या, असेही जरांगे म्हणालेत.आजपासून पुढील आंदोलनाची तयारी सुरू मी कोणालाही पाठिंबा दिला नाही. कोणाला पाडा, यासाठी पक्षाचे नाव सांगितले नाही. महाविकास आघाडी, महायुती किंवा अपक्ष यांपैकी कोणालाही माझा पाठिंबा नाही. मी त्यातून अलिप्त झालो आहे, अशी भूमिकाही मनोज जरांगे यांनी यावेळी मांडली. मला राजकारणापेक्षा आपण सर्व जण मिळून आपल्या आंदोलनाची तयारी करू आजपासून पुढील आंदोलनाची तयारी सुरू केली असल्याचेही सांगत आज पासून दौरे सुरू केले असल्याची माहिती दिली.