जयदत्त अण्णांनी बोलवली कार्यकर्ते बैठक ! ठाम निर्णय नाही.
उद्या निर्णय घेण्याची शक्यता?कोणाला हात,कोणाला साथ

आनंद वीर(प्रतिनीधी)-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतल्याने कार्यकर्ते,नेते यांच्यात नाराजीचा सूर पसरला होता. जयदत्त अण्णा क्षीरसागर गटामध्ये गेल्या आठवड्यातच शहरातील विविध भागातील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला होता. बार्शी रोडवरील अमोल लॉन्स मध्ये मुस्लिम समाजाचा मेळावा देखील घेण्यात आला होता.विधानसभेची जोरदार तयारी करून कार्यकर्त प्रचाराला कामाला लागले होते.परंतु ऐनवेळी जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने कार्यकर्त्याचा नेत्यांचा हिरमोड झाला. पुतण्या योगेश क्षीरसागर,संदीप क्षीरसागर यांच्यापासून दुरावलेली व नाराज कार्यकर्ते हे अण्णा गटात सामील झाले होते. परंतु आता ऐनवेळी माघार घेतल्याने त्यांना संभ्रम निर्माण झाला की कोणाचा प्रचार करायचा कोणाला मतदान करायचे यासाठी आज जयदत्त क्षीरसागर यांनी मोजक्याच कर्यकर्त्याची बैठक बोलावली होती. सर्व कार्यकर्त्यांचे नेत्यांचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले, काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले की अण्णा तुम्ही ठाम निर्णय घ्या कोणत्याही पक्षात प्रवेश करा आम्ही काम करायला तयार आहोत, येत्या काही दिवसात नगरपालिका निवडणूक असल्यामुळे भावी नगरसेवक देखील संभ्रमात पडले आहेत.उद्या निर्णय घेणार असल्याचे सांगितले. दोन्हीपैकी कोणत्या पुतण्या पैकी कोणाला हात व कोणाला त्याची साथ की तटस्थ राहायचे हे सांगितले नाही.सर्व कार्यकर्त्यांना वाटले होते की अण्णा आज निर्णय घेऊन आपली भूमिका स्पष्ट करतील परंतु आज झालेल्या बैठकीमध्ये ठामपणे अण्णांनी निर्णय सांगितला नसल्याने कार्यकर्त्यांना निर्णयासाठी उद्याची वाट पहावी लागणार आहे.