आता सांगा बीड विधानसभेत हवा कोणाची ?

बीड विधानसभा मतदारसंघात ३१ उमेदवार रिंगणात असून महत्वाच्या चार उमेदवारात क्षीरसागर भावांमध्ये लढत होणार असून यात जरांगे फॅक्टर देखील पाहायला मिळू शकतो. जरांगे पाटील यांनी आवाहन करून देखील अनिल जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे क्षीरसागर व्यतिरिक्त अनिल जगताप आणि ज्योती मेटेअसे सर्वच मातब्बर उमेदवार रिंगणात आहेत . अनिल जगताप शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आहेत. मात्र पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून त्यांनी बंडखोरी केली. मागील 40 वर्षांपासून जगताप शिवसेनेत कार्यरत आहे. तर दिवंगत विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. ज्योती मेटे या उच्च पदस्थ अधिकारी होत्या. मात्र मेटे यांच्या निधनानंतर त्या राजकारणात आल्या आहेत. प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने प्रयंत्न करत आहे परंतु तरी ३ बाबी निकाल फिरवू शकतात
१.मनोज जरांगे पाठील शेवटच्या क्षणी काय निर्णय घेतात ?
२.शेवटच्या क्षणी माघार घेतलेले जयदत्त क्षीरसागर कोणाला पाठींबा देतात?
३.रविन्द्र क्षीरसागर यांना मानणारा एक वर्ग आहे ,ते मुलाला कि पुतण्याला कौल देतात ?
उमेदवाराच्या अनुकूल/प्रतिकूल बाबी –
संदीप क्षीरसागर अनुकुल ,१.शरद पवार यांना मानणारा मराठा मुस्लीम मतदान ,
२.कालच्या सभेत सत्ते मध्ये मोठो जबाबदारी देण्याची शरद पवार यांची घोषणा
प्रतिकूल १.मागील निवडणुकीत दिलेली आश्वासने अपूर्ण
२. निवडणुकी नंतर जनतेत न मिसळणे
३. जरांगे वादात मराठा मत आणि पक्षा मुले OBC मते घटण्याची शक्यता
योगेश क्षीरसागर अनुकूल १. शहरातील विकास कामा मुळे आणि प्रश्नांची सोडवणूक करण्याचे कौशल्य महणून OBC समाजात लोकप्रिय
२.संस्थांचे जाळे असल्याने कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांचे मते
३. उच्च शिक्षित , किमान लोकांचे म्हणणे एकूण तरी घेतात
४. वडील भारतभूषण क्षीरसागर यांचे रेडीमेड नेटवर्क
प्रतिकुल: १. महायुती उमेदवार असल्याने मराठा मुस्लीम मते घटणार
२. बीड शहरात सर्वपरिचित पण ग्रामीण भागात अनोळखी
३. माजी नगराध्यक्ष म्हणून पाणी प्रश्न ,स्वच्छता ,अतिक्रमणे याचे नियोजनात अयशवी
अनिल जगतापअनुकूल १. तरुणांची मोठी फळी मागे
२. शिसेनेच्या शाखा व कार्य कर्त्यांची जवळीक महणून ग्रामीण भागात परिचित
३. ग्रामीण भागात शिवसेनाला मानणारा मोठा वर्ग
प्रतिकूल : १. शिसेनेचे विभाजन झाल्याने हक्काचा मतदार देखील विभागाला गेला
२. शिवसेनेचे ८० टक्के समाजकारण ऐवजी ८० टक्के राजकारण व २० टक्के समाजकारण या मुद्यावर लोक विचार करू लागले
३.प्रत्येकवेळी पक्ष बदल आणि घेतलेले निर्णय फिरवण्याचा इतिहास
ज्योती मेटे अनुकूल : १. स्व . विनायक राव मेटे यांच्या बद्धल जनतेत सहानभूती
२. उच्च शिक्षित आणि प्रशासनाचा अनुभव
प्रतिकूल :१. स्व.मेटे यांच्यानंतर लोका मध्ये त्यांची झालेली ओळख पुरेशी नाही