ताज्या घडामोडी
शिरूर कासार येथे धस यांच्या प्रचारार्थ पंकजाताई यांची उद्या जाहीर सभा
बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे भाजपा आणि मित्रपक्षांचे आवाहन

शिरूर कासार. : माजी मंत्री तथा विधानपरिषदेचे सदस्य सुरेश धस यांच्या प्रचारार्थ उद्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.उद्या दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाठीमागे असलेल्या येथे ही प्रचारसभा होणार आहे.माजी मंत्री सुरेश अण्णा धस यांच्या ऐतिहासिक विजयासाठी पंकजाताई यांची प्रचारसभा ही नांदी ठरणार असून आष्टी,पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा,शिवसेना,रिपाई (आठवले गट) आणि मित्रपक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.