मग्रूर क्षीरसागरा पासून बीड मुक्त करून मी विकास करणार…अनिल जगताप
बालाघाट अनिल दादाच्या पाठीशी माता मावल्यानी औक्षण करून दिल्या विजयासाठी शुभेच्छा !

बीड, प्रतिनिधी- तळागाळातील माणसांची जाण असणारे सर्वसामान्यांचे नेतृत्व मा. अनिलदादा जगताप यांच्या प्रचार दौऱ्यास मतदारांचा जोरदार प्रतिसाद मिळत असून ग्रामीण भागातील मतदार औंदा दादा तुम्हीच आमदार आशा प्रतिक्रिया व्यक्त करत विजयासाठी शुभेच्छा देत आहेत. विशेष म्हणजे गावागावतील माता-माऊल्यांनी औक्षण काढून दादा तुझ्या पाठीशी आम्ही आहोत, तू काळजीच करू नको म्हणून विजयासाठी आशीर्वाद देखील दिले.
दि.10 नोव्हेंबर 2024 रोजी बीड विधानसभा अपक्ष उमेदवार मा. अनिलदादा जगताप यांनी बालाघाटावरील चांदणी, तांदळवाडी घाट, साखरे बोरगाव, उदंड वडगाव, चौदासवाडी, सफेपूर, रत्नागिरी, गवारी, मांजरसूंबा, सासेवाडी, खंडाळा, कोळवाडी या गावात निमित्त प्रचार गावाकऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या तर माजी मंत्री प्रा सुरेश नवले यांच्या उपस्थितीत कॉर्नर बैठका देखील घेतल्या. बालाघाटावरील गावागावात मतदारांनी अनिलदादा यांचे आगमन होताच जोरदार स्वागत करत हृदय सत्कार केला. आजवर आम्ही अनेकांना संधी दिली. मात्र प्रत्येकाने आमचा विश्वासघातच केला. आम्ही भूल थापांना बळी पडलोत. पण आता दादा तुम्ही सर्वसामान्यांचा आवाज आहात त्यामुळे औंदा आम्ही पूर्ण ताकदीने आमदार करणार असल्याची भावना बालाघाटावरील गावागावातून मतदारांनी व्यक्त केली. दरम्यान माजी राज्यमंत्री प्रा सुरेश नवले आणि अनिलदादा यांनी कॉर्नर बैठकीत मगरूर क्षीरसागरांपासून बीडवासियांची सुटका करून बीडचा विकास करायचा आहे आणि सामान्यांचे मूलभूत प्रश्न सोडवायचा आम्ही निर्धार केला असून आम्हाला मतदानरुपी आशीर्वाद द्या असे आवाहन केले. याप्रसंगी अनिलदादा जगताप आणि प्रा नवले यांच्याबरोबर सहकारी कार्यकर्ते समर्थक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता तर गावागावात कॉर्नर बैठकीसाठी मतदारांची देखील भरीव उपस्थिती होती.