सुरेश कुटेच्या डेअरी,कुटे सन्सवर कारवाई !अर्चना कुटे अद्यापही फरार.
333 कोटी 82 लाख रुपयाची मालमत्ता जप्त.

प्रतिनिधी-बीड येथील उद्योगपती सुरेश कुटे,अर्चना कुटे यांनी तिरुमला ऑइल कंपनीच्या माध्यमातून दूध, दुधापासून तयार होणारे पदार्थ, हेअर ओईल, जनावराचे खाद्यपदार्थ यासह इतर उद्योगधंदे उभारले होते.परंतु गेल्यावर्षी तिरुमाला कुटे ग्रुपवर इडीच्या अधिकाऱ्याने कारवाई केल्याने ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील ठेवीदारांनी पैसे काढण्यास सुरुवात. केली परंतु ठेवीदाराचे पैसे वेळेवर नाही मिळाल्याने ठेवीदारानी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात सुरेश कुटे,अर्चना कुटे विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले होते.त्यामुळे सुरेश कुटे हे कारागृहात आहेत तर अर्चना कुटे फरार आहेत. विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु झाला आहे. प्रचारसभांतून महायुती आणि महाविकास आघाडीकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यादरम्यान अमंलबजावणी संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे. ईडीने ज्ञानराधा मल्टीस्टेट को- ऑपरेटीव्ह सोसायटीवर कारवाई केली आहे. यात ३३३ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तर याप्रकरणात बीडच्या सुरेश कुटे यांच्या कुटे डेअरी, कुटे सन्स फ्रेश डेअरीवर ईडीने कारवाई केली आहे.राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु झाला आहे. सर्वच पक्ष आप आपल्या प्रचारात गुतंले आहे. यादरम्यान बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को- ऑपरेटीव्ह सोसायटीवर आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. या कारवाईत ईडीने सोसायटीची ३३३ कोटी ८२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.मागील काही महिन्यापासून कुटे ग्रुपच्या विविध उद्योगसमूहावर कारवाई करत मालमत्ता जप्त केले असून सुरेश कुटेंच्या इतरही मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत. परंतु ठेवीदारांचा पैसा कधी परत मिळणार हे अद्यापही स्पष्ट झाले नसल्याने ठेवीदारावर उपासमारीची वेळ येत असून ठेवीदार अडचणी सापडले नाही त्यामुळे कूटेच्या जप्त केलेल्या मालमत्तेतून ठेवेदाराची पैसे देण्यात यावी तसेच अर्चना कुटे याचा पोलिसांनी शोध घेऊन ताब्यात घ्यावे तरच ठेवीदारांचे पैसे परत मिळतील अशी मागणी ठेवीदार करत आहेत.