ताज्या घडामोडी
योगेश क्षीरसागरांची बार्शी नाका ते मोमिनपुरा रॅलीमध्ये हजारो तरुण सामील !
योगेश क्षीरसागर याना विजयी करण्यासाठी अठरापगड जाती एकत्र.

- बीड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार असलेल्या डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासाठी आता मतदारसंघात अनेक हात झटू लागल्याचे चित्र आहे. एक उच्चशिक्षित उमेदवार आणि सोबर चेहरा अशी ओळख घेऊन पुढे जात असलेल्या योगेश क्षीरसागरांना सर्व घटकातून प्रतिसाद मिळत आहे.डॉ. योगेश क्षीरसागर यांची स्वतःची तशी ही पहिलीच निवडणूक असून उमेदवार म्हणून ते पहिल्यांदाच मतदारसंघात घरोघरी जावून मतदारांच्या भेटीगाठी आहेत. एक उच्चशिक्षित डॉक्टर म्हणून ते ग्रामीण भागात परिचित आहेत. उच्चशिक्षित,शांत, संयमी असल्याने त्यांचे सर्वत्र प्रेमाने स्वागत होताना दिसत आहे. योगेश क्षीरसागरांसाठी सर्वच जाती धर्मातील लोक जोडले गेले असून, येत्या निवडणुकीमध्ये त्यांचा हाथ बळकट झाल्याचे बोलले जात आहे. बीड शहरातील बार्शी नाका ते मोमीनपुरा भागात रात्री 9 वाजता रॅली संपन्न झाली, कॉर्नर बैठकीचे रूपांतर हे सभेमध्ये झाल्याचे पहावया मिळाले. या रॅलीमध्ये हजारो तरुण युवक कार्यकर्ते व अठरापगड जातीतील नागरिक सामील झाले होते. या रॅलीला विजय रॅली असे देखील बोलले जात होते. या रॅली मध्ये शुभम कातांगळे, युनूस मेंबर, सुधीर भांडवले,अशोक वीर, ज्ञानेश्वर राऊत, गोरख काळे, शहादेव वंजारे, राजू कुसळकर, लाला महाकुंडे,सुनील गायकवाड, साजेद जागीरदार, माजेत कुरेशी, शेख मतीन यासह बार्शी नाका, ढगे कॉलनी, मोमिनपुरा भागातील हजारो युवकानी डॉ. योगेश क्षीरसागर यांचे स्वागत करून रॅली ची सुरुवात करण्यात आली. यावेळी अठरा पगड जातीतील युवक नागरिक उपस्थित होते.