सांगा गेवराई विधानसभेत हवा कोणाची ?

गेवराई हा विधानसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघात मोडतो. यात भारतीय जनता पक्षाचे लक्ष्मण माधवराव पवार हे गेवराई विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तर विजयसिंह पंडित आणि माजी आमदार बदामराव पंडित हे काका पुतणे हे चार उमेदवार शर्यतीत तर यांच्या सहा गेवराई विधान सभा लढवण्या साठी एकूण २१ उमेदवार आहेत विशेष म्हंजे आ.लक्ष्मन पवार ,विजयसिंह पंडित ,बदामराव पंडित यांच्या स्पर्धेत बहुजन वंचित ने प्रियांका खेडकर हा नवीन चेहरा निवडणूक लढवीत आहे .बीड विधानसभा मतदार संघा प्रमाणे जरांगे पाठील यांचा गेवराई मतदार संघात मोठा प्रभाव आहे . वंचित उमेदवार प्रियांका खेडकर या ओ बी सी चे मत स्वतःकडे वळवू शकतात . तेंव्हा यातील विद्यमान आमदार लक्ष्मन पवार तसेच इतर तीन उमेद्वारांचे अनुकूल /प्रतिकूल बाबी जाणून घेऊ
आ. लक्ष्मन पवार अनुकूल : १.पंडिता विरुध्द दोन टर्म विधानसभा जिंकली २. मतदार संघातील रस्त्यांची कामे केली व कामात जातीने लक्ष दिले .३. जनतेत लोकप्रियता .४. मराठा आरक्षणासाठी राजनामा देणारा आमदार म्हणून समाजाचे पाठबळ मिळू शकते
प्रतिकूल : १. मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणी निवडणूक लढणार नाही अशी घोषणा करून निवडणूक उमेदवार होणे .२. भाजप ला दिलेली सोडचिठ्ठी .३.आठ दिवस शरद पवार याच्या सम्पर्कात पण तिकीट मिळाले नाही .
विजय सिंह पंडित अनुकूल : १. मागील निवडणुकीत ६००० ने पराभव २.शिवाजीराव (दादा ) पंडितांची इछ्या म्हणून उभे राहिले .३ .दादांना मानणारा मतदार संघातील मोठा वर्ग आहे .४ . अमरसिंह पंडित यांच्या काळात झालेल्या विकासकामाचा फायदा होऊ शकतो .
प्रतिकूल :१. लोकसभा निवडणुकितील कामा मुळे दोन्ही समाज नाराज .२. मुळ गाव दैठण येथून पंकजाताई यांना मतदान न मिळणे .३. वंचित उमेदवार प्रियांका खेडकर मुळे मतांचे विभाजन शक्य
बदामराव पंडित अनुकूल : १. सलग ६ वेळेस निवडणूक लढून ३ वेळा विजयी .२. जनसामान्यात मिसळून राहण्याचा स्वभाव .३. गोदा काठ परिसरात रस्ते व काळातील झालेली कामे .४. पक्षावर सतत ठेवलेली निष्ठा त्यामुळे मविआ चे पाठबळ
प्रतिकूल : १. पुतण्या विजयसिंह हे समाज व नातेवाईकाची मते स्वतः कडे वळऊ शकतात २. वंचित उमेदवार मुळे मतांचे विभाजन शक्य .३. चार दोन व्यक्ती सोडल्या तर धूर्त पुढाऱ्यांचा अभाव