
आनंद वीर( प्रतिनिधी) बीड शहरापासून जवळ असलेल्या बिंदुसरा पालीच्या धरणामध्ये एका अनोळखी इसमाचे प्रेत 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता आढळून आले आहे.सदरील प्रेत इसमाचे असून साधारण वय 45 ते 50 आहे.अनोळखी प्रेत असल्याची माहिती ग्रामीण पोलीस ठाणे निरीक्षक बंटेवाड यांना मिळाली असता स.पो.नी. बाळराजे दराडे यांनी दिली असता ग्रामीण पोलिस मस्के,सानप, मोराळे ,मुंडे यांनी पाली तलावाजवळ जावून प्रेत पाण्याबाहेर काढण्यात आले. सदरील इसमास कोणी ओळखत असेल तर बीड ग्रामीण पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.ही आत्महत्या आहे का?असेल तर तो इसम कोण?आहे याची अद्यापही ओळख पटली नसल्याने याचा तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत.