
आनंद वीर(प्रतिनिधी)बीड शिवसेना शिंदे गटाचे बीड जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांना पक्षाने बीड विधानसभेची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ऐनवेळी महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या योगेश क्षीरसागर यांना उमेदवारी दिल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी फॉर्म भरला होता. पक्षाने दिलेले आश्वासन न पाळल्याने आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे पत्रकार परिषद घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. शिवसेनेला रामराम केला. शिवसेना शिंदे जिल्हाप्रमुख आणि जगताप झाल्यापासून मोठ्या शिवसेने शिंदे गटात मोठ्या प्रमाणात कार्यकर्तेनी प्रवेश केला होता. त्यामुळे शिवसेना मजबूत झाली होती. परंतु आणि जगताप यांची उमेदवारी नाकारल्याने आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे अनिल जगताप यांनी म्हटले. शिवसेना पक्षाकडून वारंवार अन्याय होत असल्याचे जगताप म्हणाले. यापुढे कोणत्याच पक्षात सक्रिय नसून बीड मतदार संघातील जनता आणि जरांगे पाटील हेच माझे पक्ष असतील असेही जगताप म्हणाले. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला खिंडार पडले.