अखेर जयदत्त अण्णा,योगेश क्षीरसागर एकत्र !
अण्णांच्या हाती घड्याळ !योगेश क्षीरसागराना पाठिंबा दिला.

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड विधानसभेमध्ये क्षण क्षणाला उमेदवार निर्णय बदलत असून आज बीड जिल्ह्यासाठी भूकंपाचा दिवस आहे की काय? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. आज सकाळीच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु शेवटच्या दिवशी त्याने अर्ज माघारी घेतल्याने मतदारसंघात वितर्कवितर्क लढवले जात होते. जयदत्त अण्णा यांनी उमेदवारी अर्ज माघारी का घेतला याचे अध्यापही कारण समजले नसून ते दोन्ही पुतण्यापैकी कोणाला पाठिंबा देणार याकडे बीड मतदार संघ तसेच अवघ्या बीड जिल्ह्याचे लक्ष लागले होते. परंतु आज दुपारी जयदत्त क्षीरसागर,योगेश क्षीरसागर, रवींद्र शिरसागर, हेमंत क्षीरसागर हे सर्व एकाच वाहनातून नगर रोड वरील नीलकमल हॉटेल येथे येणार असून पत्रकार परिषदेमध्ये जयदत्त क्षीरसागर हे पाठिंबा योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा देणार आहेत. संदीप क्षीरसागर सोडता जवळजवळ सर्वच क्षीरसागर कुटुंब एकत्र झाल्याचे चित्र दिसत आहे.या पाठिंबामुळे योगेश क्षीरसागर यांचे पारडे जड झाले असून विधानसभा निवडणूक सोपी झाली आहे.