वंचितचे पुरुषोत्तम वीर यांना आमदार करण्यासाठी बीडचे मुस्लिम सज्ज !
वीर यांनी डोअर टू डोअर प्रचार,मतदारसंघात गाठीभेटी व कॉर्नर बैठका.

एम आय एम चे जिल्हा सचिव अन्वर पाशा यांचे सह असंख्या पदाधिकारी यांचा वंचित मध्ये प्रवेश.
राजीव जोशी(प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पुरुषोत्तम वीर यांनी डोअर टू डोअर प्रचार करत मतदाराच्या गाठीभेटी घेत असून कॉर्नर बैठकांना उत्सर्फ प्रतिसाद मिळत आहे. सर्व समाज घटकातील वंचित घटकातील मतदारांनी वंचित चे उमेदवार यांचा प्रचार करण्यास जोरदार सुरुवात केली.वंचित बहुजन आघाडीच्या जोशाबा समतापत्र जाहीरनामा हा सर्वांगीण विकासाचा जाहीरनामा असून मुस्लिम धर्मगुरू,प्रेषित,पैगंबर पवित्र धर्मग्रंथांचा कोणाकडूनही अवमान होणार नाही.याकरिता मोहम्मद पैगंबर बिल लागू करुन त्याद्वारे मुस्लिमांना संरक्षण देण्याची हमी त्यासोबतच मुस्लिमांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने वंचित ने आवाज उठवला व धर्माच्या पलीकडे जाऊन समता प्रस्थापित करणाऱ्या वंचित बहुजन आघाडी सोबत बीड मधील मुस्लिम व दलित समाज उभा राहिला असून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा.एड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी एम आय एम या पक्षातील जिल्हा सचिव अनवर पाशा यांचे सह असंख्य कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ता तय्यब जफर यांचे हस्ते वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश करून बीडचे उमेदवार पुरुषोत्तम नारायणराव विर यांना मताधिक्याने निवडून आणण्यासाठी मुस्लिम समाज सज्ज असल्याचे अन्वर पाशा यांनी सांगितले.