ज्ञानेश्वर राऊत यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर सचिवपदी निवड !
विद्यार्थ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव कटीबद्ध.. ज्ञानेश्वर राऊत

आनंद वीर(प्रतिनिधी) डॉ.योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) प्रवेश केल्यापासून बीड मतदार संघात असंख्य तरुण मोठ्या प्रमाणात डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश करत आहेत. योगेश क्षीरसागर यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते बीड शहरातील बार्शी नाका भागातील ज्ञानेश्वर राऊत यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शहर सचिवपदी निवड करून जबाबदारी देण्यात आली.शहरातील आशीर्वाद लॉन्स येथे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली,प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण, बीड विधानसभेचे अध्यक्ष डॉ योगेश क्षीरसागर यांच्या मान्यतेने ज्ञानेश्वर राऊत यांची विद्यार्थी आघाडीच्या शहर सचिवपदी निवड झाल्याचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे स्वागत करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी बीड शहर जिल्हाध्यक्ष शुभम कातांगळे व ग्रामीण जिल्हाध्यक्ष अजिंक्य आनेराव यांच्यासह विद्यार्थी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाने दिलेली जबाबदारी व कार्य जबाबदारीने पार पाडणार असल्याचा विश्वास यावेळी ज्ञानेश्वर राऊत यांनी बोलून दाखवला.