जयदत्त क्षीरसागरांनी पाठिंबा दिल्याने कार्यकर्त्यात”कही खुशी कही गम” !
अण्णांनी पुतण्याला पाठिंबा दिला परंतु कार्यकर्ते व पदाधिकारी काम करतील का?

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड विधानसभा निवडणूकित उमेदवारांनी घेतलेल्या निर्णयामुळे धक्कादायक बदल होत असून यामुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमात सापडले होते. मात्र काल जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी पुतण्या योग्य क्षीरसागर यांना पाठिंबा दिल्याने कार्यकर्त्यामध्ये “काही खुशी कभी गम”पहावयास मिळाला. जगताना क्षीरसागर यांनी गेल्या आठवड्यामध्ये पाडळशिंगी टोल नाका या ठिकाणी कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना बोलवून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते. पाडळशिंगी ते बीड पर्यंत रॅली काढून विरोधकांना चांगलीच धडकी भरवली होती. परंतु शेवटच्या दिवशी जनता अण्णांनी अर्ज मागे घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. दोन्ही पैकी कोणत्या पुतण्याला अण्णा पाठिंबा देणार याकडे बीड मतदारसंघासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते. परंतु काल पुतण्या योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा देऊन विधानसभेची निवडणूक सोपी केली. त्यामुळे योगेश क्षीरसागर यांचे पारडे जड झाले.मात्र संदीप क्षीरसागर व योगेश क्षीरसागर यांच्यापासून दुरावलेले, नाराज झालेले कार्यकर्ते हे जयदत्त अण्णा गटात सामील झाले होते. परंतु काल दिलेल्या पाठिंब्याने कार्यकर्ते हे उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवत आहेत, तर काही कार्यकर्ते हे सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत आहेत. त्यामुळे पाठिंबा दिल्याने अन्नाचे चे कार्यकर्ते खरंच काम करतील का? महायुतीचे उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आज दुपारी बीड शहरात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री धनंजय मुंडे सह नेत्याच्या उपस्थितीत सभा होणार असून अजित पवार काय बोलाल याकडे अवघ्या बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.