करुणा मुंडे यांच्या प्रचार दौऱ्यास वाढता प्रतिसाद.
बीड तालुक्याचा विकास करण्यासाठी एकदा संधी द्या...करुणा मुंडे

आनंद वीर (प्रतिनिधी)बीड विधानसभेसाठी अपक्ष उमेदवार असलेल्या करुणा धनंजय मुंडे यांनी प्रचाराचा नारळ फोडून मतदाराच्या गाठीभेटीवर भर देत आहेत.पाच वर्षांच्या राजकीय प्रवासात निःस्वार्थपणे बीड वासियांची सेवा करत आलेल्या करुणा मुंडे या केवळ बीड विधानसभेचे अपक्ष उमेदवार नसून बीडवासियांचा झंजावत आहे आणि याच झंजावाताला प्रारंभ झाला. यानंतर बीड मतदार संघातील राजुरी सर्कल, लिंबागणेश सर्कल, मांजरसुंबा, चौसाळा,पाली सर्कल, खोकरमोहा, आर्वी,शिरूर, जि प, नळावंडी सर्कलमधील गावागावातील देवस्थानाचे दर्शन घेतले. दरम्यान गावाखेड्यातील युवकांनी मतदारांनी करुणा मुंडे यांचे गावात आगमन होताच पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले व गावातील नागरिकांच्या, विद्यार्थी व महिलांच्य अडचणी जाणून घेतल्या. तर माता-माऊली आणि भगिनींनी यांचे औक्षण करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले. विधानसभा निवडणुकीत मलाच मतदान रुपी आशीर्वाद द्या असे आवाहन करुणा मुंडे यांनी केले.अनेक वर्ष सत्ता भोगून बीड विकासाचा खेळखंडोबा करणाऱ्या क्षीरसागरा पासून मी बीडची सुटका करणार आहे. बीड शहरात जागोजागी पडलेले खड्डे, कचऱ्याचे ढिगारे तसेच पंधरा दिवसाला पिण्याचे पाणी यामुळे बीड शहरातील नागरिक वैतागली असून आता क्षीरसागराणा थारा देणार नाहीत.बीड शहरासह, ग्रामीण भागाचा विकास करून कायापालाट करायचा आहे. यासाठी माझ्यावर एकदा विश्वास ठेऊन मला साथ द्या. आपल्या अपेक्षेप्रमाणे मी बीडचा विकास करून दाखवेल. आपण मला मतदानरुपी आशीर्वाद दिला तर घरणेशाही,मक्तेदारी व गुंडगिरी संपुष्टात येईल आणि सामान्यची सत्ता स्थापित होऊन सामान्यांचे मूलभूत प्रश्न सुटतील. त्यासाठी मला मतदानरुपी आशीर्वाद द्यावा असे आवाहन बीड विधानसभे च्या अपक्ष उमेदवार करुणा मुंडे यांनी बीड मतदार संघातील जनतेला केले. अपक्ष उमेदवार करुणा मुंडे या जिवाचे रान करीत असून, बीड शहरासह ग्रामीण भागात प्रचार दौरे करत मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. यांच्या प्रचारार्थ मतदारसंघातील युवक,महिल, मतदाराकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.दौऱ्याला ठिकठिकाणी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत करुन मतदार स्वतः समोर येत असून करुना ताई चिंता करु नका तुझ्यासोबत नेते नसते तरीही आम्ही मतदार आहोत असे ठामपणे सांगत आहेत.बीड शहरासह मतदारसंघातील वाडी, वस्ती, तांडा सर्व परिसर पिंजून काढत शेतात, वस्तीवर जावून करुणा मुंडे या मतदारांची भेट घेऊन बीड तालुक्याचा विकास झाला नसून भकास झाला आहे याचे पुरावे देत आहेत. यांच्या कामाची पद्धत आणि विकासाची तळमळ मतदारांना समजावून सांगत आहे. आतापर्यंत करून मुंडे यांनी आणि गोरगरिबांना, रुग्णांना मदत केली असून,यामुळे मतदारसंघात करुणा मुंडे चे वादळ आलेले दिसत असून हे वादळ आता विधानसभेत जावून थांबणार अशी प्रतिक्रिया तालुक्यातील मतदार व्यक्त करत आहेत. करून मुंडे यांना बीड शहरासह ग्रामीण भागातही वाढता प्रतिसाद मिळत असून, करुणा मुंडे यांना पसंती देत आहेत. युवक,नागरिक,महिला मतदान रुपी आशीर्वाद नक्कीच देतील असा विश्वास करुणा मुंडे यांनी बोलून दाखवला.