
आनंद वीर(प्रतिनिधी) बीड शहर पोलीस ठाणे हद्दीतील मोंढा रोडवरील पुलाशेजारी बिंदुसरा नदीपात्र जवळी रस्त्यावर एका अंदाजे वय 46 वर्षीय व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला.आज सकाळी ही माहिती नागरिकांनी बीड शहर पोलीस ठाणे पोलिसांना दिली असता घटनास्थळी जाऊन खून झालेल्या व्यक्तीचे नाव मझहर सय्यद शेख अख्तर राहणार तांदुळवाडी असल्याची माहिती मिळाली असून खुणाच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. कोण कोणी व का केले याचे कारण अद्याप स्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत.