अनिल जगताप यांना कोणी दिला पाठिंबा?
पाठिंबा दिल्याने अनिल जगताप यांचे पारडे जड, राजकीय गणित बदलले.

बीड. बीड विधानसभेचा उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना. बीड विधानसभेसाठी अपक्ष अर्ज केलेले उमेदवार अनिल जगताप यांना आज मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पाठिंबा दिल्याने आणि जगताप यांचे पारडे जड झाले असून राजकीय गणित बदलले आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या सर्व इच्छुक सहकाऱ्यांना उमेदवारीचे अर्ज भरण्याच्या आदेश दिला होता. त्यावर बीड विधानसभेसाठी अठरा उमेदवाराने अर्ज केला होता,परंतु अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मनोज जरांगे यांनी सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचा आदेश दिला. त्यावर सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाचे पालन केले. यापैकी अपक्ष उमेदवारी अर्ज केलेले अनिल जगताप यांना जरांगे पाटील यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज पाठिंबा दिल्याने अनिल जगताप यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला असून, उद्यापासून सर्व मराठा समाजातील उमेदवारांना अनिल दादा जगताप यांचा प्रचार करणार असून यामुळे बीड विधानसभेचे राजकीय गणित बदलले असून मनोज तरंगे यांच्या पाठिंब्याने अपक्ष उमेदवार असलेले अनिल जगताप यांचा विजय होणार असल्याचे बोलले जात आहे.