ताज्या घडामोडी

मला एकदा संधी द्या..सोमेश्वर कदम..म.न.से.जिल्हा सचिव

बीड जिल्ह्यातील बेरोजगारी दूर करून, मूलभूत समस्या सोडवणार...

बीड राजीव जोशी ( प्रतिनिधी )महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बीड विधानसभ मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सोमेश्वर राजकुमार कदम यांच्या प्रचारास बीड शहरात तसेच ग्रामीण भागात प्रचंड प्रतिसाद मिळत असून बीड तालुक्याचा विकास करण्यासाठी मतदार राजांनी एकदा संधी द्यावी असे आवाहन सोमेश्वर कदम यांनी केले आहे.मनसे मधील अनेक पदाधिकारी बीड विधानसभेची उमेदवारीसाठी इच्छुक होते, परंतु सोमेश्वर कदम यांनी गोरगरिब, शालेय,महाविद्यालय विद्यार्थी तसेच अपंगांना केलेली मदत व पक्ष वाढीसाठी केलेले कार्य पाहून सोमेश्वर कदम यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पक्षाने दिलेली जबाबदारी व विश्वास सार्थकी करणार असल्याचे सोमेश्वर कदम यांनी बोलून दाखवते.बीड शहर वासियांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असेल पावसाळ्यात देखील पंधरा दिवसाला पिण्याचे पाणी मिळते, जागोजागी कचऱ्याचे ढिगारे, नालेसफाई वेळेवर न झाल्याने रस्त्यावर येणारे घाणीचे साम्राज्य त्यामुळे विविध रोगास निमंत्रण होत असून बीड शहर वासियाची सुटका करण्यासाठी मतदान रुपी आशीर्वाद द्यावा असे आव्हान देखील सोमेश्वर कदम यांनी केले. तसेच बीड जिल्ह्यातील वाढती बेरोजगारी यामुळे शहरातील, ग्रामीण भागातील नागरिक हे औरंगाबाद पुणे मुंबई या शहरा मध्ये जाऊन काम , मोर मजुरी करावी लागते म्हणून त्यांना हाताला रोजगार व काम देण्याचे पहिले काम करणार असल्याचे देखील आश्वासन दिले. वाढत्या महागाईबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करून महागाई बाबत उपाययोजना करणार असल्याचे देखील मागणी करणार असल्याचे सांगितले. सोमेश्वर कदम यांनी या आधी गोरगरिबाच्या, रुग्णांच्या, विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलने केली असून त्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश प्राप्त झाले होते. शहर,ग्रामीण भागात दौरे, बैठकीवर भर दिला असून लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडवल्या याची माहिती दिली.परिसरातील नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सदर परिसर अजूनही मूलभूत संविधान पासून वंचित असल्याचे सांगितले. त्यावर सोमेश्वर कदम यांनी तात्काळ उपायोजना करून मदत केली. त्यामुळे मतदारांनी मतदान आरोपी आशीर्वाद द्यावा असे आवाहान सोमेश्वर कदम यांनी केले आहे.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button