API बाळराजे दराडेचा जुगाऱ्यांना दणका ! 48 लाखाचा मुद्देमाल जप्त.
गेवराईतील 10 जुगारी सह वाहणे ताब्यात.

बीड.बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अवैध धंद्यावरच्या कारवायात वाढ झाली असून अविनाश बारगळ हे अवैध धंदेवाल्यांचा कर्तनकाळ ठरले. बीड जिल्ह्यातील अवैध धंदे, गंभीर गुन्ह्यातील आरोपी,वाळू,मुरूम,मटका,गुटका, जुगार ,दारू यावर कठोर करवाई करण्याच्या सूचना बीड पोलीस अधीक्षक यांनी दिल्या असल्याने अवैध धंदे करणाऱ्यावर कारवाईचा फास आवळला आहे.अधीक्षक पथकाचे API बाळराजे दराडे यांना गुप्त माहिती मिळाली की गेवराई परिसरातील पांढरवाडी फाट्यापासून जवळ असलेल्या हॉटेल तोरणा च्या पाठीमागे उदय पानखडे यांच्या मालकीच्याएका पत्र्याच्या शेडमध्ये राजरोस जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली असता दिनाक 14 नोव्हेंबर गुरुवार रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास त्या जुगार आट्यावर छापेमारी केली, यावेळी जुगार खेळताना बाळूनाथ मोहन मोटे, दीपक वामनराव सोनवणे, अमोल दत्तात्रय गांडुळे, श्याम बाबुराव चव्हाण, बाळू पापा राठोड, वचिष्ठ भिमराव ठोसर, कपिल भास्कर मुंजे, ज्ञानेश्वर सूर्यकांत लांडगे, पोपट छगन दाभाडे, गणेश गोरख, दावडकर या दहा जणांना पकडले, यावेळी त्यांच्याकडील रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी,चारचाकी वाहने जप्त करण्यात आली.याची किंमत एकूण 48 लाख 18 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे अवैध धंद्यावाल्यांचे पुन्हा एकदा धाबे दणाणले आहेत. ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपाधीक्षक विश्वंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली API बाळराजे दराडे,PSI राठोड,पो.शी. निर्धार, पो. ह. आघाव, आरसीपी पथक मुख्यालय बीड चे पो.शि.पाखरे, पो. शि.सावंत, पो. शि.गिरी यांनी ही कारवाई केली.