बीड मतदारसंघाला विकासापासून वंचित ठेवणाऱ्या क्षीरसागरांना यांना घरी बसवा.कुंडलीक खांडे.
कुंडलिक खांडे यांना ग्रामीण भागातून वाढता पाठिंबा.

बीड (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार कुंडलिक खांडे यांना ग्रामीण भागातून दिवसेंदिवस वाढता पाठींबा मिळत आहे. शुक्रवारी कुंडलिक खांडे यांनी लिंबागणेश सर्कल अक्षरशः पिंजून काढले. ठिकठिकाणी झालेल्या संवाद दौर्यात कुंडलिक खांडे म्हणाले की, बीड विधानसभा क्षेत्राला विकासापासून वंचित ठेवणार्यांना घरी बसवण्याची संधी आता आली आहे.ही संधी माझ्या बंधू भगिनींनी हातची सोडू नये. पुढील पाच वर्षातील विकासाचा आराखडा माझ्याकडे तयार असून तुमच्या पाठबळावर मी विकासाचा डोंगर उभा करुन दाखवू शकतो असा विश्वास खांडे यांनी व्यक्त केला.शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार कुंडलिक खांडे यांचा ताफा आहेर धानोरा, वरवटी, पिंपळवाडी, भाळवणी, कदमवाडी, नागझरी, मान्याचा वाडा, बेलखंडी (पाटोदा), कचरवाडी, भाळवण दत्तनगर, पिंपरनई, बेलगाव, सोमनाथवाडी, मोरगाव, मुळूकवाडी, मसेवाडी, लिंबागणेश, महाजनवाडी, पोखरी आदि ठिकाणी प्रचार करताना खांडे म्हणाले की, बीड विधानसभा क्षेत्राला आजी, माजी लोक प्रतिनिधींनी कायमच विकासापासून दुर ठेवण्याचे काम केले आहे. सत्तेत असो किंवा नसो जनतेला केवळ भुलथापा देवून त्यांची मते मिळवण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात. मी लोक प्रतिनिधी नसतानाही मतदारसंघासाठी जवळपास २५० कोटी रु. विकास कामे खेचून आणली आणि जी सत्तेत होती त्यांनी काय दिवे लावले हे त्यांनाच विचारा. परिवर्तन घडवण्यासाठी मला साथ द्या, मी तुमचा विश्वास तुटू देणार नाही असे प्रतिपादन कुंडलिक खांडे यांनी केले. प्रत्यक्ष गाठीभेटी, बैठका, कॉर्नर बैठका, वेगवेगळ्या रॅली, वैयक्तिक भेटी यांच्या माध्यमातून खांडे यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.