उद्या अंबाजोगाईत आ.रोहित पवार व राजे भूषणसिंह महाराज होळकर यांच्या जाहीर सभा
प्रकाश लखेरा (प्रतिनिधी)

केज विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ आज अंबाजोगाई येथे आ. रोहित दादा पवार व राजे भूषणसिंह महाराज होळकर यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या जाहिरसभेस मतदारसंघातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
केज विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष व महाविकास आघाडी चे उमेदवार पृथ्वीराज शिवाजीराव साठे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राची बुलंद तोफ आमदार रोहित पवार यांची जाहीर सभा उद्या दि.१६ नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी २ वाजता वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालय, बस स्टॅन्ड समोर, अंबाजोगाई या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.
आ. रोहित पवार व राजे भूषणसिंह महाराज होळकर यांच्या जाहीर सभेस सर्व मतदार बंधू, महिला तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी मित्रपक्ष यांच्यासह मतदार बंधूनी उपस्थित राहावे असे आवाहन केज-अंबाजोगाई महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.