दोन्ही पंडितांना राजकारणातून हद्दपार करा ! लक्ष्मण अण्णा पवार
पंडितांचे दहशत कमी करण्यासाठी मला साथ द्या.

बीड विधानसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना उमेदवार एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत आहेत. बीड जिल्ह्यात महत्त्वाची समजली गेवराईची निवडणूक प्रचारसभा व कॉर्नर बैठकावर भर वाढला असून होताना पाहायला मिळत आहे. गेवराई पंडित विरुद्ध पंडित अशी निवडणूक पाहायला मिळत होती परंतु गेल्या पंचवार्षिक पासून पंडित विरुद्ध पवार अशी निवडणूक पहावयास मिळते.विद्यमान आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांनी भाजप वरिष्ठावर व पालकमंत्र्यांवर गंभीर आरोप करत निवडणुकीतून संन्यास घेण्याचे ठरवले मात्र गेवराई तालुक्यातील नागरिकांच्या आग्रहास्तव अपक्ष उमेदवारी अर्ज करण्यात आला. गेवराईतील जनता आता हुशार झाली असून दोन्ही पंडितांचे आमिषाला बळी पडणार नसून, पंडिताच्या दहशतीला घाबरणार नाहीत.आज गेवराई मध्ये एका बैठकीमध्ये पवार यांनी पंडितावर गंभीर आरोप करत पंडितांचा दहशत कमी करायचा असेल तर मला निवडून द्या तसेच गेवराई तालुक्यातला विकास पंडिता मुळे खुंटला आहे, दोन्ही पंडितानी फक्त घराघरांमध्ये भांडण लावायचे काम केले असून भावात भाऊ, घरात घर ठेवले नाही. त्यामुळे या पंडितांना यावेळी राजकारणातून हद्दपार करा असे आवाहन लक्ष्मण आण्णा पवार यांनी जेवढ्यातील जनतेला केले आहे. गेवराई तालुक्यातील गेल्या पंचवार्षिक विकास पाहता गेवराई ची जनता ही माझ्यासोबतच आहे व मलाच मतदान रुपी आशीर्वाद देतील असा विश्वास व्यक्त केला.