आष्टी विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार भिमराव धोंडे यांच्या शिट्टीचाच आवाज – सरपंच दादासाहेब जगताप

आष्टी (प्रतिनिधी) :- विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी तसेच आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाला एक चांगली ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून देण्यासाठी व विकासाच्या नकाशात आणण्यासाठी शेतकरी पुत्र शिक्षण महर्षी अपक्ष उमेदवार भिमराव धोंडे यांनाच लाखोच्या मतांनी विजयी करा आणि शिट्टी या चिन्हावर मत देऊन विधानसभेच्या सभागृहात पाठवा अशी विनंती कोहिणी पाटण गावचे सरपंच दादासाहेब जगताप यांनी केली आहे.
तसेच अपक्ष उमेदवार भिमराव धोंडे यांचा उमेदवारी चिन्ह शिट्टी ही निशाणी असून संपूर्ण आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातील जनतेने शिट्टी या चिन्हा समोरील बटण दाबून विजयी करावे अशी विनंती कोहिणी पाटणचे सरपंच दादासाहेब जगताप यांनी केले आहे.आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारानिमित्त अभय राजे धोंडे यांचा प्रचार दौरा साबलखेड, शिरापूर, चिंचोली, धानोरा, कुंभारवाडी, उंदरखेल, शेलारवाडी, केरूळ, मोरेवाडी, भरवाडी, किन्ही, कोहणी, बेलगाव, चिंचाळा, देसुर, शेकापूर, प्रचार दौरा करण्यात आला यावेळी ग्रामस्थांमधून स्फूर्ती साथ मिळाला.