ताज्या घडामोडी

गरजवंतांसाठी नेहमीच मैदानात उतरणाऱ्या बदामराव पंडित यांना विधानसभेत पाठवा — बप्पासाहेब तळेकर

गेवराई ( प्रतिनिधी )

गेवराई तालुक्यातल्या काही नेत्यांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या घरात आमदारकी पाहिजे तर काहींना आपली प्रॉपर्टी वाचवण्यासाठी पाहिजे. मात्र खऱ्या अर्थाने बदामराव पंडित यांनाच गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार करणे गरजेचे आहे. सर्व जाती- धर्मातील गरजवंतांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी बदामराव पंडिती नेहमीच मैदानात उतरतात. त्यांना विधानसभेत पाठविण्यासाठी आता सगळ्यांनी मशाल वर मतदान करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदचे माजी सभापती बप्पासाहेब तळेकर यांनी केले आहे.
महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार बदामराव पंडित यांच्या प्रचारासाठी शिवसेना जिल्हा समन्वयक युधाजित पंडित यांनी दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी टाकरवन, रामनगर वस्ती, शेलगाव थडी, रिधोरी, कवडगाव, सुर्डी, गव्हाण थडी, हिवरा बुद्रुक, काळेगाव, डुबा थडी, बाराभाई तांडा, राजेगाव, वारोळा, तालखेड, तालखेड तांडा, मंगरूळ तांडा आणि सावरगाव या गावांमध्ये जाऊन थेट मतदारांच्या भेटी घेत संवाद साधला. याप्रसंगी माजी सभापती बप्पासाहेब तळेकर बोलत होते. याप्रसंगी माजी सभापती अरुण इंगळे, जय भवानी कारखान्याची माजी संचालक दत्तात्रय येवले, छत्रपती साखर कारखान्याचे संचालक रावसाहेब गरड, संचालक काशिनाथ कोरडे, बळीराम भुंबे, मोहन जाधव, शरद कोरडे, रावसाहेब गायकवाड, रज्जाक इनामदार, नवनाथ लव्हाळे, रमेश आडागळे, वाचिष्ट गणगे, अशोक मुळे, बंडू गरड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना बाबासाहेब तळेकर म्हणाले की, गेवराई तालुक्याला पारतंत्र्यातून मुक्त करून लोकशाही निर्माण करण्याची काम खऱ्या अर्थाने बदामराव पंडित यांनी करून, गोरगरिबांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला आहे. त्यांच्या आमदारकीच्या काळात कोट्यावधी रुपयांची विकास कामे झाली प्रशासकीय इमारती उभा राहिल्या आणि वैयक्तिक लाभाच्या योजनाही खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या. ते चांगले काम करत असताना विरोधकांनी एकत्र येऊन कोठे नाटे आरोप करून त्यांचा पराभव केला. मात्र त्यानंतर सामान्य माणसांची किती काम अडकली हे सगळ्यांच्या लक्षात आलं. आज गेवराई तालुक्यातल्या काही नेत्यांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमदारकी आपल्या घरात पाहिजे तर काहीजणांना आपली प्रॉपर्टी वाचवायची असल्याने आमदारकी पाहिजे. मात्र लोकांनीच ठरवलंय गोरगरिबांसाठी काम करणाऱ्या बदामराव पंडितांच्या घरात आमदारकी द्यायची. कारण ती आमदार म्हणजे सामान्य माणूस आमदार हे गेल्या 30 वर्षापासून इथल्या लोकांनी अनुभवले आहे. कोणत्याही गरजवंतांचा लढा असो किंवा आंदोलन असो त्यामध्ये बदामराव पंडित हे सगळ्यात पुढे जाऊन मैदानात उतरतात त्यामुळेच त्यांना विधानसभेत मोठ्या मताधिक्याने पाठवा असे आवाहन आहे बप्पासाहेब तळेकर यांनी केले.
याप्रसंगी ठीकठिकाणी झालेल्या बैठकांमध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून बदामराव पंडित यांनाच विजयी करण्याची ग्वाही देत मशाल हाती घेतली.

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button