म.न.से.च्या प्रचार सभेस उपस्थित रहावे… सोमेश्वर कदम
प्रकाश महाजन यांची प्रमुख उपस्थिती.

बीड / प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बीड विधानसभेचे अधिकृत उमेदवार सोमेश्वर राजकुमार कदम यांच्या प्रचारार्थ दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स सहयोग नगर, बीड येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या सभेत मनसे मुख्य प्रवक्ते प्रकाश महाजन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.विधानसभा निवडणुकीच्या प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बीड विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सोमेश्वर राजकुमार कदम यांच्या प्रचारासाठी बीड शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स सहयोगनगर येथे दि. 17 नोव्हेंबर रोजी सायं. 6:00 वाजता सभेची आयोजन करण्यात आले आहे या सभेसाठी मनसे मुख्य प्रवक्ते प्रकाश महाजन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रकाश महाजन काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, सदरील सभेत बीड मतदार संघातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे उमेदवार सोमेश्वर कदम व बीड मनसे वतीने करण्यात आली आहे.