ताज्या घडामोडी
मनोज जरांगे पाटील अकरा वाजता बीड शहरात !
मराठा सेवक कै.प्रवीण पिंगळे कुटुंबांना सांत्वनपर भेट

बीड . मराठा संघर्ष युद्ध मनोज जरांगे पाटील यांनी गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषण आंदोलने केली. त्यांच्या उपोषण आंदोलनाला महाराष्ट्रातील मराठा समाजातील नागरिकांनी सामील होऊन जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच ग्रामीण भागातही उपोषणही केली परंतु सरकारने आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते परंतु ते आश्वासन न पाळल्याने मराठा समाजात सरकार विषयी संताप व्यक्त होऊन आपले जीवन संपवले होते.शिरूर तालुक्यातील शिरापूर या गावातील प्रवीण पिंगळे यांनी माझ्या समाजाला आरक्षण न मिळाल्याने दोन दिवसापूर्वी चिट्टी लिहून आत्महत्या केली होती. यामुळे तुम्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून तुम्ही कुटुंबीयांची संतवान पर भेट घेण्यासाठी, कुटुंबाला आधार देण्यासाठी आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता बीड शहरातून शिरूरकडे जाणार आहेत.