बीड जिल्ह्यात पुन्हा गोळीबार दोघे जखमी !
तक्रार मागे घेत नसल्याने गोळीबार...पाच जनावर गुन्हा दाखल.

बीड जिल्ह्यात मागील काही दिवसापासून गोळीबाराच्या घटना वाढ होत असून, किरकोळ कारणावरून गोळीबार केल्याच्या घटना घडल्या आहेत.वाटचाल बिहारच्या दिशेने होत आहे असे अनेक गुन्हेगारी घटनांवरून चर्चेत येत असते. विधान सभा निवडणुकीचा तोंडावर बीड मधील खूण प्रकरण असो की जिल्ह्यात अनेक शहरात सापडलेले अवैध शस्त्र असो की माऱ्यामाऱ्या यामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था यावर नेहमीच प्रश्न निर्माण झालेला आहे. या सर्व विदारक परिस्थितीत गुन्हे वापस घेण्याच्या कारणावरून बांगर पिता-पुत्राकडून तक्रारदारावर जीवे मारण्याचा उद्देशाने गोळीबार झाल्याची घटना अंबाजोगाई-लातूर महामार्गावर शनिवारी दि 16 रोजी रात्री 9 च्या सुमारास घडली. या घटनेत 2 व्यक्ती जखमी झाले असून अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सूरु आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, विभागीय पोलीस अधिकारी, अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, साहाय्यक पोलीस निरीक्षक आदींनी घटनास्थळी भेट दिली.मिळालेल्या माहितीनुसार संदिप गोरख तांदळे (वय28रा. हिंगणी बु. ता. जि. बीड) व त्याचे मित्र अभय संजय पंडित (वय 23 रा. गोरे वस्ती ता. जि. बीड) त्यांच्या महिंद्रा स्कॉर्पिओ क्र.MH03BW7689 मध्ये खाजगी कामानिमित्त बीड येथुन लातुरकडे निघालो असताना सेलूअंबा टोल नाक्याचे पुढे काही अंतरावर आम्ही लघुशंकेसाठी गाडी थांबवुन खाली ऊतरलो. त्यावेळी आमचे मागुन एक पांढ-या रंगाची टोयोटो कं.ची फॉर्च्यूनर जिचा पासिंग क्र. MH44T0011 ही येवुनआमचे गाडीचे समोर आडवी उभी करून त्यातील रामकृष्ण बांगर यांनी तु माझा मुलगा विजयसिंह याचे विरूध्द दाखल केलेला गुन्हा मी सांगुनही वापस घेतला नाही, असे म्हणुन शिविगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. ईतर दोन अनोळखी ईसमांनी माझा मित्र अभय पंडित यास मारहाण करित सत्यभामा बांगर हिचेकडे घेवुन गेले. सत्यभामा बांगर हिने अभय पंडित ला शिविगाळ करून चापटाने मारहाण केली,त्यावेळी विजयसिंह ऊर्फ बाळा रामकृष्ण बांगर याने त्याचे पँटीतील ऊजव्या बाजुकडून पिस्टल काढून मला जिवे मारण्याच्या ऊद्देशाने माझ्यावर फायर केली ती गोळी माझे ऊजव्या पायाचे मांडीतुन आरपार गेली, अभय संजय पंडित वाचविण्याचे ऊद्देशाने माझ्याकडे येत असताना त्याला जिवे मारण्याचे ऊद्देशाने विजयसिंह ऊर्फ बाळा बांगर याने अभय पंडित याच्यावर गोळी फायर केली ती गोळी त्याचे डाव्या पायाचे पिंडरीव्र लागून गोळी आरपार गेली, त्यावेळी आम्ही जखमी अवस्थेत खाली पडले. घटनास्थळी संतोष गौत्तम ऊजगरे, दिपक सिकंदर पवार यांनी जखमीना ओळखून अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.दरम्यान याप्रकरणी संदिप गोरख तांदळे याच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात अंबाजोगाई ग्रामीण गुरन 352/2024 कलम 109, 189(2), 191(2), 191(3), 190, 115(2), 352, बीएनएस सह कलम 3/25 शस्त्र अधिनियम कायद्यानव्ये 1. रामकृष्ण बांगर पुर्ण नाव माहित नाही, 2. विजयसिंह ऊर्फ बाळा रामकृष्ण बांगर, 3. सत्यभामा भ्र. रामकृष्ण बांगर तिन्ही रा. पाटोदा ता. जि.बीड व ईतर अनोळखी दोन अश्या पाच व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक अनिल चोरमले यांनी दिली आहे.