ताज्या घडामोडी
मनोज जरांगे पाटील यांचे बीड मध्ये अनिल दादा जगताप यांनी केले स्वागत.
मराठा सेवकांनी अनिल दादांना पाठिंबा दिल्याने अनिल दादाचा गड मजबूत.

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या बीड मधील सर्व सहकाऱ्यांनी उमेदवार असलेले अनिल दादा जगताप यांना पाठिंबा दिल्याने सर्व मराठा सेवक हे अनिल दादा जगताप यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे.आज बीड शहरात मनोज जरांगे पाटील आले असता अपक्ष उमेदवार असलेले अनिल दादा जगताप यांनी साठे चौक येथे जोरदार स्वागत करण्यात आहे. यावेळी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.शिरूर तालुक्यातील शिरापूर येथील मराठा सेवक प्रवीण पिंगळे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने दोन दिवसापूर्वी नैराश्यतून आपले जीवन संपवले. त्यामुळे मनोज जरांगे हे पिंगळे कुटुंबीयाचे सांत्वनपर भेट घेण्यासाठी बीड शहरातून जात असताना अनिल दादा जगताप यांनी जरांगे यांचा स्वागत करण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते स्वागतासाठी उपस्थित होते.