राज्यात मला स्वाभिमानाने काम करण्यासाठी भाजपाच्या नमिता मुंदडा यांनाच विजयी करा
विराट सभेत पंकजा यांचे मतदारांना आवाहन

केज ( प्रतिनिधी) कमळ हे चिन्ह लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि आ पंकजा मुंडे यांचे आहे. नमिता मुंदडा यांची निवडणूक ही माझ्या प्रतिष्टेची निवडणूक आहे. तेंव्हा राज्यात मला स्वाभिमानाने व ताठ मानेने काम करण्यासाठी आपण सर्वांनी भाजपा महायुतीच्या उमेदवार नमीता अक्षय मुंदडा, यांना प्रचंड बहुमताने विजयी करून मला आशीर्वाद द्यावेत,आसे आवाहन भाजपा नेत्या तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव, आ पंकजा मुंडे यांनी शनिवारी रात्री ८ वाजता केज तालुक्यातील आमळाचे बरड येथील प्रचार सभेत बोलताना केले…
पुढे बोलताना आ पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी राज्याची ग्रामविकास मंत्री असताना बीड जिल्ह्यात रस्त्यासाठी ११७ कोटीचा निधी मंजूर केला होता. त्यामुळे ही निवडणूक आपल्याला कोणाचाही बदला घेण्यासाठी जिंकायची नाही तर विश्वासाच्या जोरावर ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. नमीता मुंदडा यांच्या विजयात माझी प्रतिष्ठा आहे. हे सर्वांनी ओळखून हि जाहिर सभा ही नमिता मुंदडा यांच्या विजयावर शिक्का मोर्तब करणारी असून,भाजपा महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांना प्रचंड मतांनी आपण विजयी करावे. असे आवाहन भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आ पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना केले.
केज आणि परळी विधानसभा मतदार संघात थेट लढत होत आहे.या साठी मतदारांनी जागरूकतेने मतदान करावे आसे आवाहनही आ पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना केले.
आ.नमिता मुंदडा यांच्या कामाकडे पाहून मतदान करा –मा.खा.प्रितम मुंडे
पंकजाताई यांना आपल्या जनतेला मंत्री झालेले पाहायचे आहे त्यामुळे पंकजाताईचे हात बळकट करण्यासाठी आणि त्यांना मंत्री करण्यासाठी आपण सर्वांनी नमिता मुंदडा यांना निवडून द्या असे आवाहन प्रीतम मुंडे यांनी केले.
बजरंग सोनवणे यांची धोका देण्याची प्रवृती — अक्षय मुंदडा
खासदारांना कारखाना उभा करताना अजित पवार, धनंजय मुंडे यांना मदत केली. एवढे करूनही त्यांनी धोकाच दिला. खासदार साहेबांची धोका देण्याची प्रवृत्ती आहे. २६-१०-२०२० साली कार्यक्रमांमध्ये धनुभाऊंच्या हाताने कार्यक्रम घेतला त्यामध्ये कारखाना कर्जमुक्त झाल्याचे सांगितले मग शेअर धारकांना त्यांचा हिस्सा का दिला नाही ? असा प्रश्नही अक्षय मुंदडा यांनी केला. उमेदवाराकडून निवडणुकीच्या अगोदर बॉंडपेपरवर लिहून घेणारे त्यांना निवडून आल्यानंतर बाहेरही निघू देणार नाहीत. त्यांचा निधी देण्याचे काम हे करणार आहेत. अशी बोचरी टिका अक्षय मुंदडा यांनी यावेळी केली. जलजीवन योजनेचे काम प्रितमताई यांनी केले. ग्रामीण भागातील महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी आणलेली योजना आमदार पंकजाताई यांनी सरकारला सुचवलेली होती. त्यामुळे याचा फायदा महिलांना मोठ्या प्रमाणात होत आहे असे विचार अक्षय मुंदडा आहे यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी संतोष हांगे, विजयकांत मुंडे, राणा डोईफोडे, डॉ शालिनी कराड, डॉ वासुदेव नेहरकर, रमाकांत मुंडे, विष्णू चाटे, संदीप पाटील, सुनील गलांडेपाटील, विष्णू घुले, भारत काळे यांनीही आपले विचार मांडले.
सर्वप्रथम केज तालुका ऊसतोड मुकादम संघटनेच्या वतीने आ पंकजाताई मुंडे यांचा, शाल, पुष्पहार,उसाची मोळी आणि कोयता देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर रिपाई आठवले गटाचे ईश्वर सोनवणे, बाळासाहेब ओव्हाळ, अंबादास तुपारे यांनी देखील सत्कार केला. त्यानंतर आ पंकजा मुंडे व मान्यवरांच्या हस्ते भाजपाच्या जाहीरनामायाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी अंबाजोगाई येथील गणेश काचगुंडे, व असंख्य सहकारी,चिंचोलीमाळी येथील डी बी नखाते व सहकारी यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. त्यांचा सत्कार यावेळी आ पंकजा मुंडे यांचे हस्ते करण्यात आला.
या या जाहिर सभेला केज तालुक्यातील व नेकनूर महसूल मंडळातील कार्यकर्ते मोठया संख्येने हजर होते.
सूत्रसंचलन भाजपचे तालुका अध्यक्ष भगवान केदार यांनी तर आभार मुरलीधर ढाकणे यांनी मानले.