कड्यातील सभा देणार महेबूब शेख यांना निर्णायक आघाडी
राष्ट्रवादीचे युवा नेते सुनील नाथ यांच्या नियोजनाचे ही झाले कौतुक

महाविकास आघाडीचे उमेदवार महेबूब शेख यांच्या प्रचारार्थ कडा येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेली सभा त्यांना निर्णायक आघाडी देणार असल्याची चर्चा आष्टी तालुक्यात सुरू झाली आहे. या सभेसाठी कडा येथील युवक नेते सुनील नाथ यांच्याही नियोजनाचे उपस्थित नेत्यांनी कौतुक केले .
महाविकास आघाडीचे आष्टी , पाटोदा , शिरूर मतदार संघाचे उमेदवार महेबूब शेख यांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे , खा. निलेश लंके आणि खा. बजरंग सोनवणे यांची शुक्रवारी संध्याकाळी कडा येथे मौलाली बाबा दर्गा समोर सभा झाली. या सभेसाठी आष्टी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मतदारांनी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह महबूब शेख यांच्याही तडाखेबंद भाषणाने उपस्थितांची मने जिंकली . महेबूब शेख यांचे अभ्यासपूर्ण भाषण सर्वांना प्रभावित करून गेले . आष्टी येथील युवक नेते सतीश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाचा पक्षाला फायदाच होणार आहे . कडा येथे विस्तृत मैदान उपलब्ध झाले नसतानाही सुनील नाथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कडी नदीकिनारी अतिशय सुरेख अशी बैठक व्यवस्था केली होती. संध्याकाळची वेळ असूनही कोणतीही गैरसोय भासली नाही. सभेसाठी मोठी गर्दी जमलेले असतानाही कोणताही गोंधळ गडबड झाली नाही. त्यामुळे त्यांच्या नियोजनाचे तिन्ही खासदारांनी कौतुक केले . त्याचप्रमाणे उमेदवार महेबुब शेख यांनीही कृतज्ञता व्यक्त केली. कडा येथील ही सभा महेबूब शेख यांना निर्णयक आघाडी देऊ शकेल अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.