ताज्या घडामोडी

कडा येथे सकाळी भावाची तर दुपारी बहिणीची प्रचार सभा

आष्टी मतदारसंघातील प्रचाराची सांगता कडा येथे दोन वेगवेगळ्या सभांनी होणारआहे .विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी समाप्त होत आहे . कडा येथे सकाळी दहा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची आमदार बाळासाहेब आजबे यांच्या प्रचारार्थ भागीरथी पार्क केरूळ या ठिकाणी सभा होणार आहे . तर आमदार पंकजा मुंडे यांची माजी आमदार सुरेश धस यांच्या प्रचारार्थ कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालयाच्या मैदानात दुपारी बारा वाजता सभा होणार आहे . याआधी शुक्रवारी संध्याकाळी खा सुप्रिया सुळे , खा. निलेश लंके आणि खा . बजरंग सोनवणे यांची महेबुब शेख यांच्या प्रचार प्रचारार्थ सभा झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button