गेवराईत बदामराव पंडितांना आमदार करून हिटलरशाही करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करा — खा बजरंग सोनवणे
मादळमोहीत बजरंग बप्पाची विराट सभा
गेवराई (प्रतिनिधी) गेवराई तालुक्यात आमदार होण्याच्या अगोदरच महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित आणि त्यांचे भाऊ जयसिंह पंडित यांच्याकडून दादागिरीची भाषा सुरू झाली आहे. मतदान झाल्यानंतर एका एकाचा राष्ट्रीय कार्यक्रम करू आणि बिन पाण्याचा वस्तरा चालवू, अशा पद्धतीची धमकी देण्याचं काम ते करत आहेत. 20 तारखेला बदामराव पंडित यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून, गेवराई तालुक्यातील हिटलरशाही करणाऱ्याचा करेक्ट कार्यक्रम करा असे रोखठोक प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी केले आहे.
गेवराई विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बदामराव पंडित यांच्या प्रचारात दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी मादळमोही येथे झालेल्या विराट सभेचे बोलत होते. याप्रसंगी उमेदवार बदामराव पंडित माजी सभापती बाबासाहेब तळेकर, प्रसिद्ध व्यापारी शेख मुसाभाई, बीड जिल्हा परिषद चे माजी अर्थ व बांधकाम सभापती युधाजित पंडित, शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष कैलास माने, माजी सभापती तुकाराम हराळे, माजी सभापती पंढरीनाथ लगड, माजी सभापती अभयसिंह पंडित, युवानेते रोहित पंडित, माजी जि प सदस्य श्यामराव राठोड, एस वाय अन्सारी, दत्तात्रेय येवले, माजी उपसभापती भीष्माचार्य दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष अमोल करांडे, माजी उपजिल्हाप्रमुख शेख एजाज, मगन मामा चव्हाण, सखाराम हक्कदार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की, बदामराव पंडित सारखा जिल्ह्यात गोरगरिबांसाठी प्रामाणिकपणे झगडणारा नेता नाही. संकट काळात गरिबांसाठी धावून जाणारा ते देव माणूस आहेत. त्यांची आमदार म्हणून गेवराई तालुक्याला गरज आहे. त्यांच्या विरोधात महायुतीकडून लढणारे विजयसिंह पंडित हे निकालाच्या नंतर एका एकाला बघून घेण्याची आणि त्यांचा कार्यक्रम करण्याची आजच जाहीररीत्या धमकी देत आहेत. त्यांचे भाऊ जयसिंह पंडित हे तर बिना पाण्याचा वस्तरा चालवण्याची धमकी कार्यकर्त्याला देत आहेत. आता सामान्य जनतेने बदामराव पंडित यांना आमदार करून, या धमकी देणाऱ्या आणि हिटलरशाही करू पाहणाऱ्याचा 20 नोव्हेंबरला करेक्ट कार्यक्रम करा. लोकसभा निवडणुकीत मला पाडण्यासाठी भाजपाने अमरसिंह पंडित यांच्या कारखान्याला मोठा निधी दिला. जातीय समीकरणे बांधली. परंतु संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना मानणाऱ्या स्वाभिमानी समाज बांधव आणि गरीब जनतेने मला गेवराईतील 49 हजाराची लीड देऊन खासदार केले. आता तर बदामराव पंडित या खमक्या नेत्यासोबत त्यांची टक्कर आहे. जनता त्यांचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाहीत, असे स्पष्ट प्रतिपादन खासदार बजरंग सोनवणे यांनी केले.
बाबासाहेब तळेकर बोलताना म्हणाले की, माझ्याबद्दल गैरसमज करून देण्याचे काम विरोधकांनी केले. मात्र मी बदामराव पंडित यांना कधीही सोडून कुठे गेलेलो नाही आणि जाणारही नाही. मी त्यांच्या सोबतच आहे आणि यावेळी त्यांना आमदार करण्यासाठी माझ्यासह गोरगरीब जनता जीवाचं रान करीत आहे. याचे फळ 23 नोव्हेंबरला निकालातून बदामराव पंडित हे मोठ्या फरकाने आमदार झालेले दिसतील. विरोधकांची बिर्याणी आणि पैसा यावेळी त्यांच्या कामी येणार नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
बदामराव पंडित म्हणाले की, सर्व जाती धर्माच्या लोकांना मी माझ्या कुटुंबातले समजून आजपर्यंत 40 वर्ष काम करत आलो आहे. धनगर, मुस्लिम, बंजारा आणि लिंगायत समाज आरक्षण यासाठीही मी नेहमीच माझी सकारात्मक भूमिका स्पष्ट केलेली आहेच. पण त्यासोबतच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणनाच्या प्रत्येक आंदोलनाला मी भेट देऊन त्यांची आंदोलने सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. या आंदोलनात सुद्धा मी अनेक वेळा सहभागी झालेलो आहे. विरोधक मात्र मते मिळविण्यासाठी ज्या गावात जाईल तिथे नेत्याचे फोटो बदलत बॅनर लावून खोटी आपुलकी दाखवत आहेत. हे सर्व समाजाच्याही लक्षात आल्याने, त्यांचा यावेळी सुद्धा पराभव अटळ असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक युवासेना उपजिल्हाप्रमुख शेख सिराज यांनी केले.
याप्रसंगी युवा नेते यशराज पंडित, रमेश तळेकर, अनिरुद्ध लोंढे, किसान सेना तालुकाप्रमुख सतीश सपकाळ, अल्पसंख्यांक सेल तालुकाप्रमुख तय्यब पठाण, पप्पू लखोटिया, राजेश माने, युवासेना शहर प्रमुख शेख शेहदाद, उपसरपंच फत्तुभाई, कृष्णा भोपळे, रोहिदास वरपे, बाबुराव येवले, नंदकुमार हक्कदार, बाबूभाई, बंडू जगताप, बाळासाहेब सरपते, मसुदभाई पठाण, खादीरभाई पठाण, पांडुरंग पवार, सखाराम कोठेकर, संदीप सोलंकर, वशिष्ठ मोघे, अजित वर्मा, अब्बास कुरेशी, पप्पू कोठेकर आदींसह हजारो नागरिक उपस्थित होते.